शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यात पोळा साजरा

By admin | Updated: September 1, 2016 23:58 IST

गावोगावी मिरवणुका : मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा ; घराघरात मातीच्या बैलांची पूजा

बेलगाव कुऱ्हे : शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कष्ट करणाऱ्या सर्ज्या- राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ग्रामीण भागात पोळा या सणाला विशेष महत्त्व आहे. खिल्लारी बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज वातावरणात एक वेगळाच भाव निर्माण करीत होता. पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी पोळा साजरा केला.इगतपुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करीत असल्यामुळे पोळा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. शेती करताना बैल अत्यंत महत्त्वाचा उपयोगी प्राणी असून, नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलांच्या मदतीनेच करतात. ज्याच्या घरी बैलांची जोडी त्याला पूर्वी धनवान समजले जात. तालुक्यातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, कुऱ्हेगाव, नांदगाव बुद्रुक, साकूर, पिंपळगाव डुकरा येथे पोळा मोठ्या उत्साहाने अन् ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी साजरा केला.येवल्यात बैलपोळ्याची मिरवणूकयेवला : दुष्काळाची पार्श्वभूमी असली तरी येवला शहरात गुरु वारी सायंकाळी साडेसहा वाजता बैलपोळ्याची मिरवणूक, बैलांची संख्या कमी असली तरी, ढोल- ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. बैलं कमी आणि माणसे अधिक असली तरी तब्बल दोन तास मिरवणूक चालली. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता येथील गंगादरवाजा भागात सर्व शेतकरी त्यांच्या सजवलेल्या बैलांसह एकत्रित झाले. अग्रभागी राजे रघुजीराजे शिंदे यांचे वंशज भास्करराव शिंदे, अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्या घराण्याचा, डोक्यावर बाशिंग धारण केलेला मानाचा बैल बँडच्या व ढोल-ताशांच्या गजरात खंडू वस्ताद तालीम संघाच्या प्रांगणात आला आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या बैलाचा कासरा भास्करराव शिंदे, शाहू शिंदे, अरविंद शिंदे यांच्या हातात होता. मुकुंदराव पोफळे, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे आदि सुमारे ४० शेतकऱ्यांचे बैल या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दुष्काळी पार्श्वभूमीमुळे डोक्यावर मानाचे बाशिंग होते. अंगावर रंगरंगोटी आणि शानदार अशी झूल पांघरलेली होती. नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांच्या बैलांच्या ताफ्यापुढे ढोल-ताशांचा गजर चालू होता. प्रताप परदेशी यांनी आपले सफेद घोडेदेखील सजवून मिरवणुकीत आणले होते. गुरु वारी रात्री ९ वाजता मिरवणूक आटोपली. मानाच्या बैलाने प्रथम येथील मोठे महादेव मंदिराच्या पायरीवर माथा टेकवला. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी सुमारे २०० बैलांनी महादेवाचे दर्शन घेतले. राजे रघुजी शिंदे यांच्या मंदिरात दर्शन घेऊन मिरवणूक संपली. रात्री उशिरापर्यंत बैलांची पूजा प्रत्येक अंगणात होतानाचे चित्र दिसले.मिरवणुकीत सुभाष मगर, सुदाम शिंदे, यतिन पटेल, अनिल कुक्कर, दत्ता निकम, प्रभाकर शिंदे, नानासाहेब शिंदे, सुबोध शिंदे, राकेश शिंदे यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)