शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने फळभाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 15:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक  : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून गुजरात राज्यात मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजित आले आहेत. काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिक नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभाव तेजित आल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत.बाजारसमितीत वांगी, भोपळा, गिलके, दोडका, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक  : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून गुजरात राज्यात मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजित आले आहेत. काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिक नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभाव तेजित आल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत.बाजारसमितीत वांगी, भोपळा, गिलके, दोडका, कारले, ढोबळी मिरची, टोमॅटो, या फळभाज्यांची आवक होत आहे. नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.पावसाने सध्या उघडीप दिलेली असली तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजित आहे. याशिवाय नाशिकच्या बाजारसमितीतून गुजरातला शेतमाल निर्यात केला जात असुन गुजरात राज्यात या शेतमालाला व्यापाºयांकडून उठाव अधिक असल्याने बाजारभाव सध्या तेजित आहेत. आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सुत्रांनी सांगितले. बाजारसमितीत किमान ४० रूपये प्रति किलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८० रूपये प्रति किलो दराने खरेदी कराव्या लागत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.