शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलिसाच्या सतर्कतेमुळे चिमुकली अन‌् मातेची घडली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

मुंबईनाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या नातेवाइकांची प्रकृती बघून चासकर हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने जेमतेम वेगात ...

मुंबईनाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या नातेवाइकांची प्रकृती बघून चासकर हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने जेमतेम वेगात स्मार्ट रोडवरून मार्गस्थ होत होते. यावेळी अशोक स्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने बाळाला खांद्यावर घेत पायी चालत येत असलेल्या संशयास्पद पुरुषाने चासकर यांचे लक्ष वेधले. चासकर यांना संशय आल्याने त्यांनी आपली दुचाकी थांबवून तत्काळ त्या इसमाला हटकले. त्यांना त्याच्या हालचालींवरून संशय आल्याने विचारपूस सुरू केली असता त्या संशयिताने उडवाउडवीची उत्तरे देत निसटण्याचा प्रयत्न केला. यावेळी चासकर यांनी त्याला कोठून आला व कोठे चालला? असे विचारले असता त्याने बाळाला घेऊन दवाखान्यात जात आहे’ असे सांगितले; मात्र भल्या पहाटे एकटा पायी चालत जात असल्याने चासकर यांनी त्यास ‘ही मुलगी कोणाची आहे’ असा दुसरा प्रश्न विचारला. यावेळी संशयित माणिक काळे याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न केला असता चासकर यांनी त्यास धरून ठेवले. काही वेळेतच तेथे गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आणि त्यांनी त्या संशयित काळे यास ताब्यात घेत त्याच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. चासकर यांनी दाखविलेली सतर्कता अन‌् प्रसंगावधानामुळे तीन दिवसांपासून कुठलाही थांगपत्ता लागू न देणारा अपहरणकर्ता अखेर पोलिसांच्या हाती लागला.

---इन्फो--

...अशी पटविली खात्री

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपनिरिक्षक नाहीद शेख यांच्याशी तत्काळ संपर्क साधून माहिती दिली असता त्यांना त्या संशयित इसमाचे फोटो काढून मोबाइलद्वारे पाठविले. शेख यांनी त्याची ओळख पटवून अतिरिक्त पोलिसांची मदत पाठवीत असल्याचे सांगितले. काही वेळेतच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्तीपथकही न्यायालयाच्या द्वारासमोर येऊन धडकले. तत्काळ बाळाला तपासणीसाठी पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले तर संशयित काळे यास बेड्या ठोकून सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले.

---

फोटो आरवर १६ विक्रम नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

160221\16nsk_30_16022021_13.jpg

===Caption===

पोलीस शिपाई विक्रम चासकर