शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वनखात्याच्या आडमुठेपणामुळे संपूर्ण गाव अंधारात

By admin | Updated: August 13, 2015 00:01 IST

वर्षभरापासून सामग्री पडून : ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत

नाशिक : ग्रुप ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या पाड्यात शासनाच्या इतर सोयी-सुविधा पुरविल्या जात असतानाच निव्वळ वन खात्याच्या आडमुठेपणामुळे सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा (हातगड) हे सुमारे तीनशे लोकवस्तीचे गाव गेल्या पन्नास वर्षांपासून अंधारात आहे. वाडी-वस्ती विद्युतीकरणाचा भाग म्हणून या गावात विजेसाठी सर्व सामग्री येऊन पडलेली असताना वनखात्याच्या हद्दीत विजेचे खांब उभे करण्यास मज्जाव केला जात असल्याने गावाला अंधारात चाचपडावे लागत आहे. विशेष म्हणजे ठाणापाडा ग्रामस्थांनी वन हक्क कायद्यान्वये सामूहिक दावाही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून त्याबाबतची सारी पूर्तता करून दिली आहे. परंतु अशा प्रकारचा दावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने येत्या काही दिवसात संपूर्ण गावानेच उपोषण, आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. हातगड ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या ठाणापाडा येथे ६४ उंबरे असून, साधारणत: तीनशे कुटुंबे राहतात. परंतु आजवर या पाड्यात वीज पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे अंधारातच वाटचाल करणाऱ्या या पाड्यातील ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावा करून वीज मंजूर करून घेतली खरी, मात्र गावात विजेचे पोल टाकण्यासाठी वन खात्याच्या जमिनीचा वापर करावा लागतो व वन खाते त्यास नकार देत आहे. पाड्याच्या हद्दीपर्यंत विजेचे रोहीत्र तसेच लोखंडी पोल व तारा वर्षभरापासून येऊन पडल्या आहेत तसेच हद्दीपर्यंत वीज जोडणीही पूर्ण झालेली आहे. परंतु वन खात्याच्या हद्दीत पोल उभारता येणार नाही अशी भूमिका घेण्यात आल्याने संपूर्ण गावालाच अंधार कोठडीत राहावे लागत आहे. पाड्याच्या वापरासाठी वन हक्क कायद्यान्वये जागा मिळावी अशी विनंती व प्रस्ताव ग्रामस्थांनी सादर केलेला असतानाही त्यालाही मंजुरी मिळत नाही. पाड्यावर वीज नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, एकतर वन खात्याने सामूहिक दावा मान्य करावा किंवा वीज पोल टाकण्याची अनुमती द्यावी अशी मागणी जिवला गवळी, नारायण गावीत, रामचंद्र पिठे, साहेबराव पवार, आदि ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.