शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दुष्काळात टंचाईमुळे पुनंदचे पाणी सोडा

By admin | Updated: April 7, 2017 23:24 IST

कळवण : पाणीप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 कळवण : तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, पुनंद प्रकल्पाचे पाणी पुनंद नदीपात्रात, सुळे डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडून पाणीप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यंदा पावसाळा जास्त होऊनही विहिरींनी लवकर तळ गाठला आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील गावांसह पुनंद खोऱ्यात म्हणजे दह्याने दिगर, दरेभणगी, मोकभणगी, भादवण, पिळकोस, सुळे, धार्डे दिगर, नाळीद, देसराणे, रवळजी, खेडगाव, विसापूर, गणोरे, ककाणे आदिंसह परिसरातील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांबरोबर नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अशी परिस्थिती उद्भवल्याने भविष्यात मे, जून महिन्यात याचा त्रास सहन करावा लागणार आहे. पुनंद खोऱ्यातील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीचा व ग्रामसभेचा ठरावही निवेदनासोबत जोडण्यात आला आहे. तसेच सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी., तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांचा पाणी सोडण्याबाबत सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आला. शिष्टमंडळात कळवण पंचायत समिती सदस्य लालाजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य केदा ठाकरे, मोकभणगीचे उपसरपंच संजय शेवाळे, भास्कर भालेराव, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, अविनाश शेवाळे, कौतिक गांगुर्डे, राजेंद्र शेवाळे आदि उपस्थित होते.आदिवासी बांधवांनी जायचे कुठे?कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपले, शेरी, भैताने, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याने, गणोरे, सुळे, लखानी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये सध्या पाणीटंचाई जाणवू लागल्याने ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी परिस्थिती आदिवासी बांधवांची झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने आदिवासी बांधवांनी पाण्यासाठी जायचे तरी कुठे, असा सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे.अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पात या भागातील आदिवासी बांधव व त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे यांच्या जमिनी संपादित करून शासनाने प्रकल्प व त्याअंतर्गत कालवे बांधले. ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या त्यांनाच आज पाण्यासाठी शासन व यंत्रणेच्या विनवण्या कराव्या लागत असून, या प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी आदिवासी बांधवांना अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची परिस्थिती कळवण या पाण्याच्या सुजलाम सुफलाम आगारात निर्माण झाल्याची शोकांतिका आहे. यापूर्वी पाण्याची टंचाई निर्माण झाल्यावर प्रकल्पातून पाणी मिळत होते. आता मात्र परिस्थिती बदलल्याने पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. धरण उशाशी असूनसुद्धा पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आदिवासी भागात दिसून येत आहे. पुनंद प्रकल्पातील पाण्यावर कळवण तालुक्याच्या लाभक्षेत्रातील जनतेचा प्रथम अधिकार असून, जनतेला शासन व यंत्रणेने प्रथम पाणी उपलब्ध करून द्यावे व नंतर पाण्यावर इतरांचा अधिकार ठेवून आरक्षण करावे, अशी मागणी कळवण तालुक्यातील जनतेने केली आहे. (वार्ताहर)