शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका गाळ्यांची भाडेवाढ स्थगित

By admin | Updated: December 18, 2015 00:26 IST

महापौरांचे आदेश : महासभा घेणार अंतिम निर्णय

नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांची प्रचलित बाजारमूल्यानुसार केलेली अवाजवी भाडेवाढ स्थगित ठेवण्याचे आदेश देत महापौर अशोक मुर्तडक यांनी याबाबत महासभा अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. सदस्यांनी अवाजवी भाडेवाढीसंबंधी सभागृहाचे लक्ष वेधल्यानंतर महापौरांनी सदर निर्णय दिला.शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत आयुक्त डॉ. गेडाम यांनी २४ जून २०१५ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पालिका बाजारातील गाळ्यांची करारनाम्याची मुदत संपुष्टात आलेल्या १२८७ गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु समितीने सदर प्रस्ताव फेटाळून लावत संबंधित गाळेधारकांना प्रचलित बाजारमूल्यानुसारच (रेडीरेकनर) भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर संबंधितांना तीनऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली होती. तसेच थकबाकीदारांचे गाळे सील करण्याची कारवाई करतानाच पोटभाडेकरूंची तपासणी करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचेही आदेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले होते. स्थायी समितीने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करत प्रशासनाने पालिका बाजारातील गाळ्यांना भाडेवाढीच्या नोटिसा बजावल्या. परंतु गाळेधारकांना ४०० वरून ४००० रुपये भाडे आकारणी करण्यात आल्याने गाळेधारकांमध्ये संतापाची लाट उसळली. याचबरोबर काही गाळेधारकांना लक्षावधी रुपयांच्या थकबाकीच्या नोटिसा काढल्या गेल्या. या अवाजवी भाडेवाढीविरोधी गाळेधारक एकवटले आणि त्यांनी संघटनाही स्थापन करत त्याला तीव्र विरोध दर्शविला. मात्र, सदरचा निर्णय हा शासनाच्याच परिपत्रकाच्या आधारे घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.