शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मतेसाठी दुआ; आतंकवादाचा निषेध

By admin | Updated: July 8, 2016 01:04 IST

इदगाह : रिमझिम पावसात ईदचे उत्साहात नमाजपठण

नाशिक : दहशतवादी संघटना पोसणारा इस्त्राइल मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, इस्लाम जिंदाबाद, भारत जिंदाबाद...भारत की एकता हमेशा रहेगी बरकरार, अशा घोषणा देत शेकडो मुस्लीम नाशिककरांनी शहाजहांनी इदगाहवरून अवघ्या देशाला नव्हे, तर जगाला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. वरुणराजाच्या साक्षीने रमजान ईदचा दिमाखदार पारंपरिक सोहळा संपन्न झाला.रमजान पर्वचे तीस उपवास (रोजे) पूर्ण करत मुस्लीम बांधवांनी गुरुवारी (दि.७) सकाळी १० वाजता रिमझिम पावसात ईदचे विशेष नमाजपठण सामुदायिकरीत्या केले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये नमाजपठणाचा सोहळा यशस्वीरीत्या शांततेत संपन्न झाला. या वर्षीच्या नमाजपठण सोहळ्याचे आगळे वैशिष्ट्य होते ते म्हणजे प्रारंभी व समारोपादरम्यान शेकडो नागरिकांनी सुरुवातीलाच आतंकवादाचा निषेध नोंदविला तसेच भारतीय एकता व अखंडतेचा विश्वास अधिक दृढ केला. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे शहर असलेल्या मदिनामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेची सौदी सरकारने सखोल चौकशी करत सत्त्य जगापुढे मांडावे, यासाठी भारतीय तपास यंत्रणेचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावा, असे आवाहन सय्यद मीर मुख्तार यांनी उपस्थितांच्या वतीने ध्वनिक्षेपकांवरून केले.दहा वाजता नमाजपठणाला सुरुवात झाली. प्रारंभी खतीब यांनी उपस्थितांना नमाजपठणाची पद्धत सांगितली. त्यानंतर नमाजपठणाला प्रारंभ करण्यात आला. वीस मिनिटांमध्ये नमाजपठणाच्या सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, खतीब यांनी ईदच्या पावन दिवसाच्या औचित्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. उपस्थितांनी प्रार्थनेला ‘आमीन’ म्हणत प्रतिसाद दिला. सोहळ्याची सांगता सामूहिक दरुदोसलामच्या पठणाने करण्यात आली. (प्रतिनिधी)