शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह : शहरात पोलिसांकडून नाकाबंदी ‘ब्रेथ अ‍ॅनालाइजर’द्वारे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:12 IST

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सूचनेनुसार चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ठळक मुद्देचौकाचौकांत वाहनचालकांची तपासणी दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सूचनेनुसार चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकाचौकांत वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती, तर ग्रामीण भागात महामार्ग, धाबे, हॉटेल्स यावर पोलिसांनी नजर होती़ दरम्यान, मद्यपी वाहनचालक, धिंगाणा घालणाºया टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली.रात्री १२ वाजेनंतर शहरात ‘थर्टी फर्स्ट’चा ठिकठिकाणी जल्लोष पाहावयास मिळत होता. मिठाईची दुकाने, हॉटेल व मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली. दरम्यान, पोलिसांनी मात्र ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली होणाºया धिंगाण्यावर करडी नजर ठेवली होती. टवाळखोरांकडून किंवा मद्यपींकडून कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्वच ‘पॉइंट’वर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड, आनंदवली रस्ता, मखमलाबाद-आनंदवली गोदाकाठ रस्ता, मुंबई नाका, द्वारका, इंदिरानगर आदी भागांमध्ये पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रत्येक चौकामध्ये तसेच सिग्नलवर पोलीस कर्मचाºयांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी मद्यप्राशन अथवा कुठल्याही अमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आल्यास वाहनचालकांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जात होते़ पोलिसांकडून संशयित वाहनांची विविध पॉइंटवर कसून तपासणी केली जात होती. त्याचप्रमाणे वाहनचालकांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनचालकांनी अमली पदार्थाचे सेवन केले आहे की नाही, याची चाचणी ‘ब्रेथ अ‍ॅनालाइजर’ यंत्राद्वारे केली जात होती. या चाचणीमध्ये अमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून येणाºया वाहनचालकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येत होते़कडक पोलीस बंदोबस्त़़़नाशिक शहरासह ग्रामीण भागातील सर्वच ‘हॉट पॉइंट’वर पोलिसांचा ‘वॉच’ होता. शहरातील परिमंडळ-१ व परिमंडळ-२ च्या हद्दीत पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्तांसह सर्वच पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला-पुरुष पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान असे सुमारे दोन हजार पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात आले होते, तर ग्रामीण भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते़