शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिका निवडणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

By admin | Updated: May 23, 2017 02:06 IST

नाशिक : मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी गत काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात इव्हीएम मशीनचा वापर केला जातो, तर मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये शांततेत प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस दल तैनात केले जाते़ मात्र, पोलिसांना काम करताना अडचणी लक्षात घेऊन मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़ महापालिका निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि़ २२) पत्रकार परिषदेत दिली़मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी (दि़२४) मतदान होत असून, ८४ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत़ तर एक नगरसेवक निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आला आहे़ मालेगाव महापालिकेसाठी पूर्व व पश्चिम मालेगाव असे भाग असून, पूर्व भागात मुस्लीम संख्या अधिक तर पश्चिम मालेगावमध्ये हिंदूची संख्या अधिक आहे़ पूर्व भागातील काही मतदान केंद्रे ही संवेदनशील असून, तेथील मतदान केंद्रांसाठी जागेचे  आकारमान मतदारसंख्येच्या तुलनेने कमी आहे़ पूर्व मालेगावातील काही शाळांच्या मतदान केंद्रावर २६पर्यंत बुथची संख्या असल्याने अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ मालेगाव शहरातील संवेदनशील व गर्दीचे ठिकाणच्या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले आहेत़ याबरोबरच पोलिसांच्या मदतीसाठी चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़ प्रत्येक ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृश्य ही पोलीस कर्मचाऱ्यांना लॅपटॉपवर दिसणार असून, गर्दीचा अंदाज येणार आहे़ या पोलिसांसमवेत स्थानिक रहिवासी असणार असून, गर्दीच्या ठिकाणची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष तसेच संबंधित ठिकाणी ड्यूटीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वायरलेस तसेच लाउडस्पीकरवरून दिली जाणार आहे़ या ड्रोन कॅमेऱ्यामुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे़राज्यात महापालिका निवडणुकांसाठी कायदा व सुव्यवस्था तसेच गर्दीवरील नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेरे वापरले जाण्याची ही पहिलीच वेळ असून, तिचा वापर मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी केला जाणार आहे़ विशेष म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आकाशातून अगदी गल्लीबोळापर्यंतची सूक्ष्म माहिती पोलिसांना उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे या ड्रोनचा वापर पोलिसांना कशा प्रकारे लाभदायक ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़प्रचारतोफा थंडावल्या च्मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी (दि. २४) मतदान होत असून, त्यासाठीच्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मालेगाव मनपासाठी २१ प्रभागातून ८४ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. कॉँग्रेसचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यामुळे आता ८३ जागांसाठी मतदान होत आहे.