शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात गाडी चालवण्याचा परवाना, पण एकदाच नूतनीकरण कायद्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : विदेशात नाेकरी आणि शिक्षणासाठी जाणाऱ्यांना वाहन चालवण्याचा परवाना काढावा लागतो. त्याची वैधता एक वर्षासाठी असते. मात्र, ज्याप्रमाणे ...

नाशिक : विदेशात नाेकरी आणि शिक्षणासाठी जाणाऱ्यांना वाहन चालवण्याचा परवाना काढावा लागतो. त्याची वैधता एक वर्षासाठी असते. मात्र, ज्याप्रमाणे देशांतर्गत वाहन परवान्याचे नूतनीकरण करता येते, तशी तरतूद विदेशी परवान्यांसदर्भात नसल्याने अशाप्रकारे परवाने काढणाऱ्यांची अडचण होत आहे.

विदेशात जाणे आता कठीण राहिलेले नाही. विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी तसेच नोकरदारांना अनेक वर्षे तेथे राहावे लागते. कामाच्या सोयीने प्रवास करण्यासाठी अनेकांना स्वत:चे खासगी वाहन वापरावे लागते. त्यासाठी लागणारे लायसन म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना विदेशात काढता येतो. त्याचप्रमाणे तो भारतात देखील काढता येतो. आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी आवश्यक कागदपत्र तसेच पारपत्र, व्हीसा त्यासाठी आवश्यक असतो. साधारणत: एक हजार रुपये त्यासाठी खर्च येतो. मात्र, ज्याप्रमाणे अन्य परवाने नूतनीकरणासाठी काही ठरावीक वर्षांनंतर जावे लागते तशी तरतूद या प्रकारच्या वाहन परवान्यात नाही. अवघ्या एक वर्षासाठीच हा परवाना दिला जातो आणि संबंधित व्यक्ती भारतात आल्यानंतर मुदतबाह्य झालेल्या परवान्याचा त्याला पुन्हा लाभ घ्यायचा असेल तर त्याला थेट नवीनच लायसन काढावे लागते.

इन्फो....

असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

१- आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढायचा असेल तर नाशिकसह आरटीओच्या कोणत्याही कार्यालयात काढता येतो. त्यासाठी तुमचा भारतात वाहन चालवण्याचा परवाना काढणे आवश्यक आहे.

२- आंतरराष्ट्रीय लायसन काढण्यासाठी अन्य नेहमीच्या पुराव्यांबरोबरच पासपोर्ट तसेच व्हीसा असणे आवश्यक आहे.

३ साधारणत: असे लायसन काढण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.

४ अशाप्रकारचा परवाना हा मॅन्युअल असतो. त्यासाठी एक हजार रुपयांचा खर्च येतो.

इन्फो...

कोण काढतो हा परवाना

१ विदेशात नोकरी आणि शिक्षणासाठी विद्यार्थी जातात. काही जण व्यवसायासाठी जातात. तेथे भ्रमंतीसाठी वाहने वापरली जातात.

२ विदेशात कामकाजासाठी फिरावे लागत असल्याने आपल्या सोयीच्या वेळी आणि ठिकाणी पोहाेचण्यासाठी स्थानिक वाहतूक साधनांवर अवलंबून राहण्यापेक्षा अनेक जण खासगी वाहन वापरतात.

३ काही जण स्वत:चे वाहन घेऊन विदेशात जातात किंवा काही जण तेथे वाहन भाड्याने घेतात.

४ वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना भारतातूनच काढून अनेक जण जातात. हा परवाना अवघ्या एका वर्षासाठीच असतो.

कोट...

विदेशात जाण्यासाठी भारतात आंतरराष्ट्रीय वाहन चालवण्याचा परवाना काढता येतो. पासपोर्ट आणि व्हीसासह अन्य कागदपत्र असतील तर वाहन परवाना काढता येतो. मात्र, त्याची मुदत एक वर्षाची असते. मुदत संपल्यानंतर ती व्यक्ती विदेशात स्थायिक झाली असल्यास त्याला पुन्हा विदेशात परवाना काढावा लागतो.

- वासुदेव भगत, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,

इन्फो...

कोरोना काळात संख्या घटली

२०१८- ४१०

२०१९- ४६६

२०२०- १०३

२०२१- ६६