शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वाळलेले झाड कोसळले

By admin | Updated: August 12, 2016 22:50 IST

नागरिकांच्या रोषानंतर सहा झाडे तोडली

नाशिक : धोकादायक वृक्षांमुळे दिवसेंदिवस जीवघेणा बनत चाललेल्या गंगापूररोडवर शुक्रवारी सकाळी नवशा गणपती मंदिराजवळ एक वाळलेला वृक्ष कोसळून दुचाकीवरून जाणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांचा जमाव जमत त्यांनी महापालिका आणि वृक्षप्रेमींविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला. अखेर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करत गंगापूररोडवरील सहा वाळलेली धोकादायक झाडे तोडण्यात आली. गंगापूररोड परिसरात एकूण २३ झाडे धोकादायक स्थितीत आहेत.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गंगापूररोडचे विस्तारीकरण हाती घेतले, परंतु रस्त्यात अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यास काही पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली आणि प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचले. वाद-प्रतिवादानंतर न्यायालयाने अखेर काही अटी-शर्तींवर झाडे तोडण्यास परवानगी दिली असली तरी वृक्षप्रेमींकडून त्यास विरोध कायम आहे. रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या झाडांमुळे गंगापूररोड जीवघेणा बनत चालल्याने परिसरातील नागरिकांनी सदर झाडे तातडीने हटविण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नवशा गणपतीजवळ एक वाळलेले झाड दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा कामगारांवर पडले. त्यात दोन्ही कामगार जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महापालिका व तथाकथित वृक्षप्रेमींविरुद्ध संताप व्यक्त केला. याचवेळी स्थानिक नगरसेवक विलास शिंदे, विक्रांत मते यांनीही सदर झाडे तातडीने तोडण्याविषयी आग्रह धरला. नागरिकांचा वाढता रोष पाहता महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. यावेळी परिसरातील २३ वाळलेल्या धोकादायक झाडांपैकी सहा झाडे तातडीने तोडण्यात आली. अगदीच भुसा झालेल्या आणि कुजलेल्या या झाडांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आठ दिवसांपूर्वीच भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले झाड सिल्व्हर ओक शाळेच्या बसवर कोसळले होते. त्यात बसचालक जखमी झाला होता, तर तीन दिवसांपूर्वी एक झाड कोसळले होते. पावसामुळे सदर धोकादायक झाडे कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने ती तातडीने तोडण्याची मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)