शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी केली धर्माची चिकित्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

नाशिक : डॉ. आंबेडकरांनी बुद्ध आणि कबीरानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले होते. त्याचे मुख्य कारण ...

नाशिक : डॉ. आंबेडकरांनी बुद्ध आणि कबीरानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानले होते. त्याचे मुख्य कारण बुद्ध आणि कबीराप्रमाणे येणाऱ्या धर्मव्यवस्थेला फुले यांनी आव्हान दिले होते. बुद्धाने सांगितले होते की, सत्याची, धर्माची चिकित्सा करा. धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. तसेच ज्या गोष्टी अनुभवास येत नाहीत, ज्यांची पडताळणी करता येत नाही किवा ज्यांच्या अस्तित्वाचा पुरावा नाही त्यांना सत्य मानू नका. असे विचार प्रसिद्ध लेखक व विचारवंत, माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या महात्मा फुले व डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती समारंभानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, यज्ञ, वेद, आत्मा, परमात्मा,पुनर्जन्म या साऱ्या धार्मिक संकल्पनांविरुद्ध फुले, आंबेडकरानी बंड उभे केले. फुले महान बंडखोर आहेत. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरू मानले होते. हजारो वर्षांच्या इतिहासात स्त्री, शुद्र, शेतकरी यांच्यासाठी कुणीही आंदोलने केली नाहीत. तसेच धार्मिक, सांस्कृतिक सत्तेला प्रश्न विचारले नाहीत. हे काम फुले यांनी केले. म्हणूनच त्यांना जनतेने महात्मा ही पदवी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य सचिव प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन कार्याध्यक्ष संजय करंजकर व प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. परिचय वसंत खैरनार यांनी करून दिला. ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले.

इन्फो

देशाच्या नवनिर्माणातील योगदान

भारतात अस्पृश्यांसाठी आणि मुलींसाठी महात्मा फुले यांनी प्रथम शाळा काढण्याचे धाडसाचे काम केले. डॉ. आंबेडकरांनी आपले शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक धोरण फुलेंच्या कार्य आणि कर्तृत्वाकडे पाहूनच ठरवले. त्यांनी सामाजिक क्रांतीला, राजकीय स्वातंत्र्याला अधिक महत्व दिले. दोघांची कामे परस्परांना पूरक राहिली. एवढेच नव्हे तर घटनेत स्त्रियांचे, दलितांचे हक्क अबाधित कसे राहतील हे डॉ. आंबेडकर यांनी पाहिले. वाघ यांनी फुले, आंबेडकर यांच्या देशाच्या नवनिर्माण कामातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष वेधले.

फोटो