शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जिल्ह्यात चर्मोद्योग व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:13 IST

पूर्वापार भारतीय समाजव्यवस्था ही व्यवसायानुसार विभागली आहे. आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यानिपढ्या जपलेले कौशल्य लुप्त होत असताना चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारु पाला आला आहे. एकेकाळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे. चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. जिल्ह्यातल्या शेकडो व्यापारी व हजार ते पंधराशे कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देआर्थिक संकट : कोट्यवधींचे व्यवहार ठप्प; पर्यायी वस्तूंमुळे बसतोय फटका

मनोज देवरे ।कळवण : पूर्वापार भारतीय समाजव्यवस्था ही व्यवसायानुसार विभागली आहे. आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यानिपढ्या जपलेले कौशल्य लुप्त होत असताना चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारु पाला आला आहे. एकेकाळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे. चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. जिल्ह्यातल्या शेकडो व्यापारी व हजार ते पंधराशे कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.नाशिक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी व शहरात खाटिकांकडून छोटे व्यापारी चामडे गोळा करतात. त्या कातड्यांवर मीठ चोळून तो माल दहा ते पंधरा दिवस गुदामात ठेवला जातो. यानंतर मद्रास येथे पाठवला जात असे. परंतु मद्रास येथील कंपन्या विविध कारणांमुळे बंद झाल्याने या कातड्याला मागणी कमी झाल्याने दीडशे ते दोनशे रु पयाला विकले जाणारे कातडे वीस रु पये ते तीस रु पये अशा मातीमोल दारात विकण्याची वेळ चर्मकार व्यापाऱ्यांवर आली आहे.चर्मोद्योगाला कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने लिडकॉम, अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ तसेच चर्मकार उद्योग संघाची स्थापना केली असली तरी चामड्याशी संबंधित लघुउद्योजकांना कोणतीही मदत मिळत नाही, तर या क्षेत्रातील बड्या भांडवलदारांना कर्ज झटपट मिळते. त्यामुळे सावकारांकडून ८ ते १० टक्के व्याजाने कर्ज घ्यावे लागत असल्याची तक्र ार लघुउद्योजकांनी केली आहे. चामड्यांच्या वस्तूंवर पूर्वी कोणताही कर नव्हता आता कर आकारणी होत आहे. या व्यवसायाशी संबंधित कारागिरांपासून दुकानांतील कामगारांपर्यंत हजारो लोकांना उपासमारीची वेळ आली आहे.परराज्यातील चामडे खरेदी करणाºया कंपन्या बंद झाल्याने चामडे निर्यातीला खीळ बसली आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ यामुळे व्यवसाय संकटात आहे़- बाळासाहेब जाधव,संत रोहिदास फुटवेअर, एक्सपोर्टरआमचा पिढीजात व्यवसाय असून, मी गेल्या अनेक वर्षांपासून चमड्याच्या चपला बनवत होतो. परंतु आता प्लॅस्टिकच्या पादािणांना पसंती असल्याने व्यवसाय डळमळीत झाला आहे. शासनाने चर्मोद्योगांना नवसंजीवनी द्यावी़-तुळशीराम जाधव,चप्पल विक्र ेतेकच्च्या चामड्याचा दर (एका जनावरामागचा दर)तीन वर्षांपूर्वी आत्ताशेळी ११० ते २०० रु ., ३० ते ५० रु .मेंढी २०० ते २५० रु . १० ते ३०रु.म्हैस १००० ते १३०० रु ., ५०० ते ७००बैल १२००० ते १७०० रु . ८०० ते १२००

टॅग्स :businessव्यवसाय