शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात दुभाजकच अपघाताना कारणीभूत

By admin | Updated: May 14, 2016 22:21 IST

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचा जावईशोध : लाखो रुपये खर्चून बांधलेले दुभाजक हटविण्याचे काम सुरू

 सटाणा : शहरातून जाणारा विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील अतिक्रमण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वारंवार अपघात होऊन हा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. सुमारे साठच्या वर निष्पाप बळी गेले तर शेकडो विकलांग झाले. दुर्घटना घडली की फक्त बायपासचा विषय चर्चिला जातो. मंगळवारच्या दुर्घटनेने हेच सिद्ध झाले. जनप्रक्षोभ पाहून आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसमोर तावातावाने बैठक घेऊन या बैठकीत होणाऱ्या दुर्घटनांना रस्ता दुभाजक कारणीभूत असल्याचा जावईशोध लावला. वाहतूक सुरळीत असावी हा मुख्य उद्देश ठेवून नाशिक नाका ते ताहाराबाद नाकादरम्यान लाखो रु पये खर्चून बांधलेले रस्ता दुभाजक काढण्याचे फर्मान सोडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग हा सटाणा शहरातून जातो. हा मार्ग गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे साहजिकच वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. मात्र शहरातून जाणाऱ्या या मार्गावर पक्की अतिक्रमणे आणि राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे टपरीदादांनी निर्माण केलेले हातगाडी आणि टपरींचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांना निमंत्रण मिळत असते.गेल्या सात वर्षांपूर्वी या रस्त्याची कोंडी दूर करण्यासाठी बांधकाम विभागाने जिजामाता उद्यान ते ताहाराबाद नाका हा रस्ता सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. (वार्ताहर)