शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशातून येते अमली ‘कुत्ता’ गोळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:14 IST

नाशिक : मालेगाव शहरात बंदी घातलेल्या; परंतु अंमल आणणाऱ्या ‘कुत्ता’ गोळीचा मुख्य स्रोत हिमाचल प्रदेश असून, गुजरातच्या सुरतमार्गे चोरी-छुप्या पद्धतीने त्या मालेगावी पाठविण्यात येत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असले तरी, मती गुंग करणाºया व काहीशा जीविताला धोका निर्माण करणाºया या गोळ्यांच्या विक्रीवर निर्बंध लादण्याच्या दृष्टीने विशेष शोध मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्दे मालेगाव शहरात कुत्ता गोळीची विक्री व सेवनाचे प्रमाण वाढले

नाशिक : मालेगाव शहरात बंदी घातलेल्या; परंतु अंमल आणणाऱ्या ‘कुत्ता’ गोळीचा मुख्य स्रोत हिमाचल प्रदेश असून, गुजरातच्या सुरतमार्गे चोरी-छुप्या पद्धतीने त्या मालेगावी पाठविण्यात येत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असले तरी, मती गुंग करणाºया व काहीशा जीविताला धोका निर्माण करणाºया या गोळ्यांच्या विक्रीवर निर्बंध लादण्याच्या दृष्टीने विशेष शोध मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.गेल्या काही महिन्यांपासून मालेगाव शहरात कुत्ता गोळीची विक्री व सेवनाचे प्रमाण वाढले असून, कमी पैशात मतीगुंग करणारी नशा देणाºया या गोळीच्या सेवनाने कितीही तास व्यक्ती नशेच्या अधीन जाऊन कोणतेही कृत्य करण्यास धजावतो. सामाजिकदृष्ट्या अतिशय गंभीर असलेले हे औषध शेड्युल ड्रग्जमध्ये मोडले जाते. डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय या गोळीची विक्री, साठवणूक करता येत नसतानाही मालेगावी सहजपणे या गोळ्या उपलब्ध होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस खात्याने या गोळ्यांचे सेवन करणारे तसेच तस्करीच्या मार्गाने विक्री करणाºया काहींना ताब्यात घेतले. त्या आधारे केलेल्या चौकशीत हिमाचल प्रदेशात या कुत्ता गोळीचे उत्पादन केले जात असल्याची प्रथमदर्शनी माहिती हाती आली आहे. गुजरातच्या सुरत, अहमदाबाद तसेच मध्य प्रदेशातील भोपाळमार्गे मालेगावी या गोळ्या तस्करांमार्फत पोहोचविल्या जातात. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने काही औषध विक्रेत्यांकडे चौकशी केली असता, सदरच्या गोळ्या या औषध विक्रेत्यांकडून घेतलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोळ्या पुरविणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तरुणांना या गोळीच्या माध्यमातून व्यसनाधीन करण्याचे षडयंत्र आहे की काय अशी शंकाही बोलून दाखविली जात आहे. अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणारच्बुधवारी यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना बोलावून आगामी पंधरा दिवस स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात येत असून, या तपासणीचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. शासन पातळीवर या गोळ्यांचा पुरवठा रोखण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास केला जात आहे.