शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या बंदला डॉक्टर्स असोसिएशनचा पाठिंबा

By admin | Updated: March 24, 2017 23:27 IST

सिन्नर : डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंदला सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संघटना आणि आयएमए सिन्नर यांनी पाठिंबा दिला आहे.

सिन्नर : डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संघटना आणि आयएमए सिन्नर यांनी पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी सकाळी येथील पंचवटी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत सर्व रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  डॉक्टर देव नसून माणूसच आहे आणि ते सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे भ्याड हल्ले निंदनीय असल्याचे डॉ. विजय लोहारकर यांनी सांगितले. विविध ठिकाणी डॉक्टर व रुग्णालयांवर होत असलेल्या हल्ल्यांचा यावेळी तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. डॉ. सागर सदगीर आणि डॉ. संदीप शिंदे यांनी डॉक्टरांसंबंधी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. बी.एन. नाकोड, डॉ. अशोक सोनवणे, डॉ. जी.एल. पवार व्यासपीठावर उपस्थित होते. डॉक्टरांच्या सन्मानार्थ संस्था नेहमी अग्रेसर आणि कटिबद्ध राहील, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप मोरे यांनी दिली. सचिव डॉ. सचिन सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक मुख्तार सय्यद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  यावेळी डॉ. दीपककुमार श्रीमाली, डॉ. चेतन क्षत्रिय, डॉ. योगेश पाटील, डॉ. विजयकुमार करवा, डॉ. शांताराम शिंदे, डॉ. राहुल मोरे, डॉ. सम्राट भार्गवे, डॉ. राजेंद्र कमानकर, डॉ. शरद केदार, डॉ. सोपान दिघे, डॉ. जीतेन क्षत्रिय, डॉ. बी. एस. आरोटे, डॉ. आर.आर. बोडके यांच्यासह शहरातील डॉक्टर्स उपस्थित होते. (वार्ताहर)