शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दिवाळी शुभेच्छांचे ग्रिटिंग कार्ड झाले हद्दपार

By admin | Updated: October 20, 2016 02:00 IST

भ्रमणध्वनीचा प्रभाव : भेटकार्डची जागा घेतली लघुसंदेश आणि व्हॉट्स अ‍ॅपने

नाशिक : पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साऱ्या गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रिटिंग कार्ड डोळ्यासमोर येत. आपल्या जीवलगांनी, आप्तस्वकीयांनी पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वत: भेटून दिलेले ग्रिटिंग कार्ड्स वर्षानुवर्षे सांभाळून ठेवली जात. वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणींना उजाळा दिला जायचा. सोशल मीडियाच्या जगात आता हे ग्रिटिंग कार्ड हद्दपार झाले असून, एकेकाळी ८०-९० टक्के असणारी ग्रिटिंग कार्डची मागणी केवळ पाच टक्क्यावर आली आहे. ग्रिटिंग कार्ड देणाऱ्यांनीच प्रमाण कमी केल्यामुळे आता ग्रिटिंग कार्ड बनविणारे, संदेश लिहिणारे (कॉपीरायटर), ग्रिटिंग कार्ड विकणारे या साऱ्या साखळीवरच त्याचा परिणाम झाला असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ग्रिटिंग कार्डची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आता गिफ्ट आयटम्स ठेवून इतर पर्यायांचा विचार करावा लागत आहे. पूर्वीच्या काळी दिवाळीच्या खर्चात ग्रिटिंग कार्ड्स खरेदी, पोस्टिंगचा खर्च याचे सेपरेट बजेट बाजूला काढून ठेवावे लागायचे. दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी ग्रिटिंग कार्ड समोरच्याला मिळेल, असे नियोजन करून तिकीट लावून, व्यवस्थित पत्ता टाकून ग्रिटिंग पाठविले जायचे. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना तर ग्रिटिंग कार्ड दिले जायचेच पण व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्यासाठी विविध कार्यालये, कंपन्या, बॅँका, लहान-मोठ्या संस्था यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात ग्रिटिंग कार्डची देवाणघेवाण केली जायची. विविध सामाजिक संस्था, बचतगट हेदेखील मोठ्या प्रमाणात ग्रिटिंग कार्ड बनवून विकत असायचे. त्या संस्थांना आर्थिक मदत करायची या पवित्र हेतूने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ग्रिटिंग कार्ड खरेदी केले जायचे. ग्रिटिंग कार्डमध्ये कल्पकता, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आदि विविध गोष्टींचा विचार केलेला असायचा. मात्र आता सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे काम सुलभ, स्वस्त, बरेचदा तर फुकट, जलद झाले असल्याने अबालवृद्धांनी पारंपरिक ग्रिटिंग कार्ड्सना बाय बाय करीत व्हॉट्स अप, एसएमएस, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, फेसबुक, मेसेंजर यांना आपलेसे केले आहे. सोशल मीडियाचा विस्तार होण्याआधी व मोबाइल जगतात क्रांती झाल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक स्वस्तातल्या बल्क एसएमएसला प्राधान्य देत होते. आता हे एसएमएसही मागे पडत चालले असून व्हॉट्स अप, फेसबुक आदि सोशल मीडियाने त्याची जागा घेतली आहे. एकेकाळी आपले वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या ग्रिटिंग कार्ड्सना आता घरघर लागली आहे. (प्रतिनिधी)