शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा टॅँकरमुक्त; पाण्याचा प्रश्न सुटला

By admin | Updated: September 3, 2014 00:37 IST

जिल्हा टॅँकरमुक्त; पाण्याचा प्रश्न सुटला

नाशिक : आॅगस्टमध्ये जिल्ह्णात सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून, महिनाअखेर जिल्ह्णातील सर्व टॅँकर बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यातही टॅँकरची मदत घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातूनही यंदा टॅँकर हद्दपार झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत अजूनही २० टक्के पाऊस कमी झालेला असला तरी, आॅगस्ट २०१३ अखेर जवळपास ८० टॅँकरद्वारे ७३ गावे, २७५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. यंदा जून व जुलै या दोन महिन्यांत पाठ फिरविणाऱ्या पावसाने आॅगस्टमध्ये जोरदार हजेरी लावली. परिणामी नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागतानाच धरणांच्या पाणी साठ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्णात आजमितीला धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के इतका साठा असून, त्यातही गंगापूर धरण समूहात ८० टक्के, पालखेड समूहात शंभर टक्के, तसेच गिरणा समूहात ४२ टक्के साठा आहे. अजूनही पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काही भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गावाकडील पाझरतलाव, शेततळ्यांमध्येही पाणी साठल्याने गावाच्या विहिरींनाही पाणी उतरले आहे. अशा परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. ३१ आॅगस्टअखेर जिल्ह्णातील सिन्नर, नांदगाव, चांदवड या तीन तालुक्यांतील दोनशे गावांना ३१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. मात्र सोमवारी ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होता, तेथे पाण्याचा स्त्रोत निर्माण झाल्याने प्रशासनाने टॅँकर बंद करण्याचा निर्णय घेतला असून, यंदा पहिल्यांदाच संपूर्ण जिल्हा टॅँकरमुक्त झाला आहे.