शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेची ‘वसाका’लाही नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:18 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सक्तीच्या वसुलीवरून राजकारण तप्त झालेले असताना बॅँकेने आता भाजपचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या ताब्यात असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यालाही वसुलीची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर व आमदार अहेर हे दोघेही चुलत बंधू आहेत.

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेने वसाकाला नोटीस पाठवित दणका दिला

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सक्तीच्या वसुलीवरून राजकारण तप्त झालेले असताना बॅँकेने आता भाजपचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या ताब्यात असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यालाही वसुलीची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर व आमदार अहेर हे दोघेही चुलत बंधू आहेत.आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅँकेने थकीत वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलावाचा धडका लावला आहे. बॅँकेच्या या सक्तीच्या वसुलीस शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष, संघटनांनी विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही जिल्हा बॅँकेने शेतकºयांकडून वसुली करू नये, अशी मागणी केली. त्यावरून जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आहेर व छगन भुजबळ यांच्यात कलगीतुरा रंगला असताना अध्यक्ष आहेर यांनी थकबाकीदार असलेल्या वसाकाला नोटीस बजावली आहे. वसाकाकडे जिल्हा बॅँकेचे ६ कोटी ७८ लाख रुपये थकले असून, दोन वेळा नोटिसा बजावूनही कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने गेल्या आठवड्यात तिसरी नोटीस बजाविण्यात आली. या नोटिसींमध्ये थकबाकी न भरल्यास थेट जप्तीची कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी जिल्हा बॅँँकेने शासनाच्या हमीपत्रावर वसाकाला कर्जपुरवठा केला होता. परंतु त्याचा भरणा न केल्याने जिल्हा बॅँकेने वसाकाला नोटीस पाठवित दणका दिला आहे.