शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमर्यादा एक लाख करण्याचा निर्णय जिल्हा बॅँक बैठक

By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST

हिरे बंधूंसह कोकाटे अनुपस्थित

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमार्फत शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज ८५ हजारांवरून एक लाख रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल (दि.१३) झालेल्या जिल्हा बॅँक संचालकांच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. संचालक मंडळ निवडून आल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीस दोन्ही हिरे बंधू संचालक, तसेच माजी आमदार माणिकराव कोकाटे बैठकीस अनुपस्थित होते. अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस उपाध्यक्ष सुहास कांदे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अनिल कदम, आमदार जे.पी. गावित, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, दिलीप बनकर, किशोर दराडे, शिवाजी चुंभळे, केदा अहेर, सचिन सावंत, नामदेव हलकंदर, परवेज कोकणी, धनंजय पवार, गणपतराव पाटील, अ‍ॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, कार्यकारी संचालक सुभाष देसले आदि उपस्थित होते. बैठकीत नियमित १५ विषयांवर चर्चा होऊन पाच समित्यांवर संचालक नियुक्तीचे अधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्यात आले. त्यानुसार पाच विविध प्रकारच्या समित्या नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. बॅँकेतील आर्थिक कारभार पाहण्याचे व त्या अनुषंगाने स्वाक्षरीचे अधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्याच्या विषयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. बॅँकेत १९०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात १२३० कर्मचारीच कार्यरत असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याचे शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. जर १२३० कर्मचाऱ्यांचीच मर्यादा होते, तर मग सेवानिवृत्त झालेले १०० कर्मचारी पुन्हा वेतनावर सेवेत कशाला घेतले? अशी विचारणाही कोतवाल यांनी केली. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा ८५ हजारांवरून १ लाख रुपये करण्याचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. कर्जमर्यादा वाढविण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात कर्ज वाटपच अडचणीत आल्याची चर्चा काही संचालकांमध्ये होती.(प्रतिनिधी)