शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक निवडणूक : पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम शक्य

By admin | Updated: April 17, 2015 00:41 IST

समान जागा मिळाल्या तरच एकत्रीकरण?

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असून, ढिकले-हिरे पॅनलच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू होताच दोेन्ही गटांमध्ये मान-सन्मान देण्या-घेण्यावरून आता चर्चा सुरू झाल्याचे समजते. ब गटासाठी असलेल्या सहा जागांपैकी निम्म्या निम्म्या जागा दोन्ही गटांना मिळाल्या पाहिजे, असा चर्चेचा सूर व्यक्त होत असल्याचे वृत्त आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची अंतिम पारूप मतदार यादी मागील आठवड्यात प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याची सहकार कायद्यातच तरतूद असल्याचे काही माजी संचालकांचे म्हणणे असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा पुढील आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी (दि. २२) होण्याची शक्यता आहे.स्व. उत्तमराव ढिकले यांच्या पॅनलचे नेतृत्व आता त्यांचे चिरंजीव डॉ. सुनील ढिकले यांच्याबरोबरच माजी संचालक शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील आदि करण्याची शक्यता असून, या पॅनलला अ‍ॅड. संदीप गुळवे, धनंजय पवार यांचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी ढिकले यांच्या पॅनलबरोबरच तिकडे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे व देवीदास पिंगळे यांचे दुसरे पॅनल, तर अद्वय व आमदार अपूर्व हिरे बंधूंचे तिसरे पॅनल तयार होण्याची शक्यता होती; मात्र उत्तमराव ढिकले यांच्या निधनानंतर अचानक सर्व समीकरणे बदलून आता हिरे पॅनलने ढिकले पॅनलसोबत एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, त्यासाठी चर्चेच्या फेऱ्याही सुरू असल्याचे समजते.