शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख रुपये नुकसान भरपाईच्या बनावट मेसेजमुळे जिल्हा प्रशासनापुढे उभा राहिला पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल ...

नाशिक: कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना आपत्ती विभागाकडून चार लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात गेल्या काही दिवसात दोन हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारची कोणतीही योजना नसताना आलेल्या अर्जांचे करायचे काय, असा पेच प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचा मेजेस गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याच्या आशयाचा हा मेसेज असून, मदतीसाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्र असेदेखील पुष्ठ्यर्थ जोडण्यात आलेले आहेत.

--इन्फो--

आपत्ती व्यवस्थापनाकडे आले दोन हजार अर्ज

आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उल्लेख असलेला मेसेज फिरत असल्याने नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात दररोज अर्ज दाखल होत आहेत. जिल्हाभरातून आलेले अर्ज काही टपालातून प्राप्त झाले आहेत, तर काहींनी प्रत्यक्ष कार्यालयात आणून दिले आहेत. काहींनी आवक - जावक विभागात अर्ज जमा केले.

--इन्फो--

अर्जांना उत्तर देण्याची वेळ

अशा प्रकारची योजनाच अस्तित्वात नसल्यामुळे आलेल्या अर्जांना उत्तर देण्याची वेळ जिल्हा प्रशासनापुढे आली आहे. या अर्जांना उत्तर दिले नाही तर त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होण्याची तसेच मदतीच्या प्रतीक्षेत राहतील. त्यामुळे त्यांना अशी कोणतीही योजना नसल्याबाबबते पत्र उलट टपाली पाठविले जाण्याबाबतचा विचार केला जात आहे.

---इन्फो--

काय आहे बनावट मेसेज

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून ४ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी, शासन आदेश, क्लेम फॉर्म जोडण्यात आलेले आहेत. गरजूंनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात अर्ज सादर करावा.

---कोट--

अशा प्रकारची कोणतीही योजना केंद्र किंवा राज्य शासनाकडून कळविण्यात आलेली नाही. हा बनावट मेसेज असून नागरिकांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष करावे.

- अर्जुन कुऱ्हाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख. नाशिक.