शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

८३ उमेदवारांना चिन्हांचे वाटप

By admin | Updated: May 12, 2017 23:39 IST

ंमालेगाव : महापालिका निवडणुकीच्या माघारी प्रक्रियेनंतर शुक्रवारी रिंगणातील ८३ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महापालिका निवडणुकीच्या माघारी प्रक्रियेनंतर शुक्रवारी रिंगणातील ८३ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता चिन्ह वाटप शांततेत व सुरळीत पार पडले. शनिवारपासून प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ५३४ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. गुरुवारी १६० जणांनी माघार घेतली तर कॉँग्रेसच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता ८३ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. २१ प्रभागांमधून ८३ उमेदवार निवडून येणार आहेत.  गुरुवारी माघारीची प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी सातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ज्या-त्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना राजकीय पक्षांची चिन्हे देण्यात आली, तर अपक्ष उमेदवारांना कपबशी, गॅस सिलिंडर, पतंग, बॅट, फुगा, रोडरोलर, कपाट, शिट्टी, सायकल आदी चिन्हांचे वाटप करण्यात आले.  तंत्रनिकेतन महाविद्यालयातील केंद्रावर काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी मध्यस्थी करीत दोघा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समज देत शांततेचे आवाहन केले होते. आजपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.