शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

------------------- शिवरायांचा इतिहास चित्रांचे प्रदर्शन सिन्नर : तालुक्यातील धनगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भिंतीवर शिवरायांचा इतिहास दर्शविणाऱ्या चित्रांचे ...

-------------------

शिवरायांचा इतिहास चित्रांचे प्रदर्शन

सिन्नर : तालुक्यातील धनगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भिंतीवर शिवरायांचा इतिहास दर्शविणाऱ्या चित्रांचे लोकार्पण करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शिंदे यांच्या वैयक्तिक निधीतून इमारतीच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागविणारे चित्र रेखाटण्यात आले आहे.

--------------

वावी-घोटेवाडी रस्त्याची दुरवस्था

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील वावी ते घोटेवाडी या रस्त्याची समृद्धी महामार्गाच्या कामावर ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारकांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

--------------------

आतड्याची शस्त्रक्रिया करत बालकाचे प्राण वाचविले

सिन्नर : शहरातील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटलमध्ये ६ दिवसाच्या बाळावर आतड्याची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करत डॉक्टरांनी त्यास जीवदान दिले. सिन्नरमध्ये प्रथमच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून एवढ्या छोट्या वयाच्या बालकावर उपचार करण्यात आले आहे. बाळाच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

-------------

विनामास्क फिरताना आढळल्यास कारवाई

सिन्नर : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने विनामास्क फिरताना आढळून आल्यास आशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहे.

-------------

भोजापूर धरणातून आवर्तन सुरू

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून गेल्या १५ दिवसांपासून रब्बी हंगामाकरिता आर्वतन सुरू आहे. यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने सर्वत्र पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा पाण्याची मागणी केली होती.