अभोणा : अयोध्येत श्री राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त येथील प्राचीन श्री राममंदिरात नागरिकांनी गुढी उभारून पताका लावत सजावट केली. महिलावर्गाने रांगोळ्या रेखाटनाबरोबरच मंदिर परिसरात दीपप्रज्वलन केल्याने मंदिर परिसर उजळून निघालाहोता.शारीरिक अंतर पाळत मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुरोहित सुरेंद्र पाठक यांच्या हस्ते महाआरती होऊन रामरक्षा पठण करण्यात आले.कोरोनाचे सावट असले तरी, अभोणेकरांनी घरोघरी गुढ्या उभारत, अंगणात रांगोळी काढून हा आनंद सोहळा साजरा केला. यावेळी शहरात प्रसादाचे वाटप करण्यात आले.
अभोण्यात महाआरती, प्रसादाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:31 IST