सिन्नर : पेट्रोल-डिझेल दरवाढीला जबाबदार असणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नरच्या वतीने ठाणगाव येथे मोफत पेट्रोल वाटप केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असतानाही केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकावर परिणाम होऊन सर्वच दैनंदिन उपयोगातील जीवनावश्यक बाबींची प्रचंड मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. याचा भार मात्र सामान्य जनतेच्या माथी मारली जात आहे. त्यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. कोरोनासदृश परिस्थितीत किराणा बाजारभाव, शेतोपयोगी औषधे, रासायनिक खतांच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्याच्या निषेधार्थ मोफत पेट्रोल विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्य जनतेला न परवडणारी ही दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ए. टी. शिंदे, पाडळीचे ग्रा. प. सदस्य चंद्रभान रेवगडे, प्रशांत काकड, योगेश शिंदे, अंकुश शिंदे, रामचंद्र शिंदे, शरद रेवगडे, नामदेव शिंदे, देवराम पाटोळे, अरुण रेवगडे, रावसाहेब शिंदे, दत्तू पाटोळे, दत्तू रेवगडे, नारायण जाधव, अरुण शिंदे आदी उपस्थित होते.
इन्फो...
पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेली आहे. म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नरने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पेट्रोल विक्री वाटप केंद्र सुरू केले आहे. तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी जर या केंद्राला मदत केली तर हे केंद्र कायम सुरू राहील. त्यासाठी मदतीचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी केले आहे.
फोटो ओळी- १७ सिन्नर २
ठाणगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नरच्या वतीने मोफत पेट्रोल वाटप केंद्राचा शुभारंभ करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.
===Photopath===
170521\17nsk_29_17052021_13.jpg
===Caption===
ठाणगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नरच्या वतीने मोफत पेट्रोल वाटप केंद्राचा करण्यात आलेला शुभारंभ.