शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कुंदेवाडी येथे आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्राचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:30 IST

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील आदिवासी बांधवांकरिता जात प्रमाणपत्र वितरण, महावितरण कंपनीतर्फे मोफत वीज कनेक्शन जोडणी व मतदार नोंदणी अभियानाचे मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्दे प्रमाणपत्र देण्यासाठी शासन कटिबद्ध वीज कनेक्शन देण्याचा संकल्प

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील आदिवासी बांधवांकरिता जात प्रमाणपत्र वितरण, महावितरण कंपनीतर्फे मोफत वीज कनेक्शन जोडणी व मतदार नोंदणी अभियानाचे मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार नितीन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर स्टाईसचे तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, महावितरण कंपनीचे अभियंता नीलेश रोहणकर, मंडळ अधिकारी माणिक गाडे, महावितरण कंपनीचे सहायक अभियंता ठुबे, स्टाईलचे व्यवस्थापक कमलाकर पोटे, सरपंच सविता पोटे, स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड काढण्यासाठी येणाºया अडचणींबाबत नामकर्ण आवारे यांनी माहिती दिली. कुंदेवाडी गावातील १०० टक्के आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नवीन रेशनकार्ड, विभक्त रेशनकार्ड देण्यासाठी प्रशासन बांधील असल्याचे तहसीलदार गवळी यांनी सांगितले. शासनाच्या वतीने कुंदेवाडी गावातीलनिराधार लोकांसाठी शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सौभाग्य योजना, सहज बिजली हर घर बिजली योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षांत चार कोटी कुटुंबांना वीज कनेक्शन देण्याचा संकल्प बजेटमध्ये मांडलेला असून, गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभियंता रोहणकर यांनी केले. त्याचप्रमाणे कुसुम योजनेअंतर्गत कृषी ऊर्जा संजीवनीचा फायदा शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात सुमारे ५८ आदिवासी लोकांना जात प्रमाणपत्र व मोफत वीज कनेक्शन अंतर्गत वीज मीटर वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर गोळेसर, संदीप माळी, अनिल दोडके, हिराबाई जाधव आदी उपस्थित होते. शिवराम माळी यांनी सूत्रसंचालन केले. कमलाकर पोटे यांनी आभार मानले.