शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
3
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
4
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
5
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
6
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
7
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
8
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
9
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
10
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
11
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
12
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
13
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
14
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
15
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
16
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
17
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
18
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
19
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
20
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)

कानडी मळ्यात ‘अर्सेनिक अल्बम’चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

------------------- वृद्धाश्रमास किराणा साहित्य भेट सिन्नर : येथील कर्पे क्रिकेट क्लब आणि फाउंडेशनने वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून अनाथ आजी-बाबा, ...

-------------------

वृद्धाश्रमास किराणा साहित्य भेट

सिन्नर : येथील कर्पे क्रिकेट क्लब आणि फाउंडेशनने वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून अनाथ आजी-बाबा, दिव्यांग आणि विकलांगांना किराणा साहित्याची मदत करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. कर्पे क्रिकेट क्लबच्या वतीने नाशिक येथील सुख-समृद्धी केअर सेंटर येथे अ‍ॅॅॅड. भगवान करपे, धनंजय शिंदे, सुदाम बोडके, नगरसेवक पंकज मोरे, प्रवीण पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ हजारांचे किराणा साहित्य केअर सेंटरला सुपुर्द करण्यात आले.

-----------------

५० महिलांना किराणा साहित्य वितरण

सिन्नर : कोविड संकटाच्या काळात ग्रामीण भागात रोजगार गमावून बसलेल्या तालुक्यातील ५० गरीब महिलांना पुणे येथील तथापि ट्रस्टच्या सहकार्याने युवा मित्रच्या वतीने कुटुंबाला १५ दिवस पुरेल अशा किराणा किटचे नुकतेच वितरण करण्यात आले. सनदी लेखापाल सौरभ यार्दी यांच्या हस्ते किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा मित्रच्या कार्यकारी संचालक मनीषा पोटे, सेक्रेटरी विलास पाटील, सहयोगी संचालिका शीतल डांगे यांची उपस्थिती होती.

--------------------

सिन्नर सार्वजनिक वाचनालयास दहा हजारांची देणगी

सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयास आकाशाचार्य रमाकांत देशपांडे यांनी ५००१ रुपयांची देणगी दिली. शालेय जीवनात या वाचनालयाने आईप्रमाणे संस्कार केलेले आहेत. आम्ही या संस्कारामुळेच साहित्यक्षेत्रात उभे असून, वाचनालयाच्या या ऋणात सदैव राहू, असे देशपांडे यांनी सांगितले. तसेच वाचनालयास शिवाजी मुरकुटे यांनी वडील स्व. नामदेव मुरकुटे यांच्या स्मरणार्थ ५००१ रुपये देणगी दिली. देणगीचा स्वीकार वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी केला.

-------------------

ठाणगाव परिसरात दोनशे वृक्षांचे रोपण

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने परिसरात २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. परिसरात आंबा, चिकू, नारळ, पेरू, रामफळ, सीताफळ, जांभूळ, फणस, निंब आदी झाडे लावण्यात आली. जनसेवाचे मार्गदर्शक मुकुंद काकड यांनी झाडे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, यावेळी मंडळाचे मार्गदर्शक अर्जुन आव्हाड, अध्यक्ष रामदास भोर, सदस्य दिनेश भोर, अजय बोडके, बाळासाहेब काकड, अक्षय घुगे, शंकर आमले, शुभम केदार, राहील मन्यार उपस्थित होते.