नाशिक : प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेत ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष सयाजी गायकवाड, सदस्य यतीन पगार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
जिल्हा परिषदेत अध्यक्ष क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर, राजीव म्हसकर, दीपक चाटे, रमेश शिंदे, मंगेश खैरनार, दादाजी गांगुर्डे, एस. एन. नारखेडे आदी उपस्थित होते. यावेळी नशामुक्त भारत अभियानाला प्रारंभ करण्यात आला. भारत सरकारच्या तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा अंतर्गत जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थ मुक्तीची शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ‘नशामुक्त भारत’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेचा परिसर तंबाखूजन्य पदार्थमुक्त करत पुढील काळात जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. (फोटो २७ झेडपी)