शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

अंबड वसाहतीत दहा तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:52 IST

सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीत सोमवार तब्बल दहा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन ठप्प झाल्याने उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीत सोमवार तब्बल दहा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन ठप्प झाल्याने उद्योजकांचे कोट्यवधी  रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.सोमवारी पहाटे साडेचार वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत अंबड औद्योगिक वसाहतीतील डब्ल्यू आणि डी सेक्टरमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याबाबत उद्योजकांनी आयमा पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सरचिटणीस निखिल पांचाळ, ऊर्जा समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांनी विभागीय विद्युत वितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भागाला विद्युत पुरवठा करणारे पाच फिडर अचानक बंद पडल्याने विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी आयमा पदाधिकाऱ्यांना सांगितले. आयमा पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याशी संपर्क साधून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, तर कुमठेकर यांनी त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिलेत. डब्ल्यू आणि डी सेक्टरमधील विद्युत पुरवठा तब्बल दहा तास खंडित झाल्याने जवळपास अर्धी औद्योगिक वसाहत ठप्प झाली होती. पहिली पाळी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात निर्यातदार उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.