शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस कार्यकारीणी बरखास्त

By admin | Updated: May 22, 2017 13:47 IST

शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची कार्यकारीणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी बरखास्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची कार्यकारीणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी बरखास्त केली आहे. नूतन कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये खांदेपालटाचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रमुख खासदार सुप्रिया सुळे यांच्या नाशिक दौऱ्यात महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर यांच्या जागी प्रेरणा बलकवडे यांची वर्णी लावली होती. त्याच वेळी पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी सर्वच स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारीणीत बदल करण्याचे संकेत दिले होते. अंबादास खैरे शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळी आंदोलने आणि मोर्चे काढून संघटन पातळीवर पक्ष सक्रीय ठेवला होता. मात्र राष्ट्रवादी शहर युवक कॉँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आली असून, त्यांच्या जागी सक्रीय युवक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामागे पक्ष संघटन मजबूत करण्याचा उददेश असल्याचे राष्ट्रवादी शहर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जे पदाधिकारी सक्रीय नव्हते. तसेच ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यांची पदे काढून ती सक्रीय कार्यकर्त्यांना देण्यासाठीच शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची सर्व कारीणी बरखास्त केल्याचे खैरे यांचे म्हणणे आहे.