शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाअभावी विषमता

By admin | Updated: July 8, 2016 00:34 IST

संभाजी महाराज : सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने समाजात जातीय विषमता वाढल्याचे उद्गार कोल्हापूर येथील खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी काढले. तथापि, आपण फक्त मराठा समाजासाठीच काम करीत नसून, संपूर्ण बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नाशिक जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उत्तमहिरा सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. भद्रकाली फ्रूट मार्केट या इमारतीत संस्थेचे नवीन कार्यालय व रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटनही यावेळी संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले की, मराठा समाजाला आजवर आरक्षण मिळाले नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच समाजात जातीय विषमता वाढली. जातीय चष्म्याऐवजी प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहायला हवे. छत्रपती शिवराय, शाहू महाराजांनी फक्त मराठा समाजासाठी नव्हे, तर अठरापगड जाती व बारा बलुतेदारांसाठी स्वराज्य मिळवले व वाढवले.