शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर बरखास्तीची कारवाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:11 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर बरखास्तीची कारवाई होण्याची शक्यता असून, आता पणन संचालकांच्या भूमिकेवर बाजार समितीचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम कलम ४५ नुसार दहा मुद्द्यांवर बाजार समितीच्या संचालकांची जिल्हा उपनिबंधकांनी नुकतीच चौकशी पूर्ण केली आहे.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर बरखास्तीची कारवाई होण्याची शक्यता असून, आता पणन संचालकांच्या भूमिकेवर बाजार समितीचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम कलम ४५ नुसार दहा मुद्द्यांवर बाजार समितीच्या संचालकांची जिल्हा उपनिबंधकांनी नुकतीच चौकशी पूर्ण केली आहे.दरम्यान, येत्या सोमवारी (दि. २१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पणन महामंडळाला सादर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाजार समितीच्या बरखास्तीचे अधिकार पणन संचालकांना असल्याने नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पाठविलेल्या अहवालावरच पणन संचालक नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीचा निर्णय घेणार असल्याचे समजते. जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत बाजार समितीच्या संचालकांचे म्हणणे व लेखी खुलासे जमा केले असून, त्यानुसार बाजार समितीच्या बरखास्तीची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. पणन कायदा कलम ४५ नुसार आर्थिक अनियमिततेसह दहा मुद्द्यांवर बाजार समितीच्या संचालकांची चौकशी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी केली. सुरुवातीला १० जुलैनंतर २९ जुलै, ३ आॅगस्टनंतर १० आॅगस्ट तसेच याच आठवड्यतील सोमवारी (दि. १४) बाजार समितीच्या संचालकांची चौकशी व युक्तिवाद पूर्ण झाल्याने त्यासंदर्भात अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी तयार केला आहे. बुधवारपासून (दि. १६) जिल्हा उपनिबंधक रजेवर असून, ते सोमवारी (दि. २१) रुजू होत आहेत. त्याच दिवशी ते पणन संचालकांकडे नाशिक बाजार समितीच्या केलेल्या चौकशीचा अहवाल सादर करणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड झाली असून, या सभापती व उपसभापतींचे पद औट घटकेचे ठरण्याची चिन्हे या बरखास्तीमुळे निर्माण झाली आहेत.