शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेच्या माहितीबाबत उदासीनता

By admin | Updated: February 1, 2016 22:26 IST

कळवण : ७१ ग्रामपंचायतींनी माहिती दिली नसल्याचे उघड

कळवण : २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेल्या विषयांबाबत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत मार्गदर्शन करून १ ते १६ विषय चर्चेत घेऊन ग्रामसभा झाल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत इतिवृत्त व त्याची माहिती, झालेले ठराव तत्परतेने पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाला सादर करणे बंधनकारक केले होते; मात्र आठवडा उलटूनही तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींनी माहिती सादर केली नसल्याची बाब समोर आली आहे.सात दिवसांत फक्त १५ ग्रामपंचायतींनी कळवण पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात माहिती सादर केली असल्याचे समोर आले आहे. येत्या ३ ते ४ दिवसात उर्वरित ग्रामपंचायतीची माहिती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. मात्र ग्रामसभेच्या माहितीबाबत असलेली उदासीनता समोर आली आहे.पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचे आणि तसा अहवाल पाठविण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी पत्रही पाठविले होते. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रथम नागरिक म्हणून ग्रामसभा यशस्वी करण्याच्या दृष्टीने सरपंच यांच्या उपस्थितीत ग्रामसभा १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा शासकीय यंत्रणेने केला असून प्रत्यक्षात ग्रामसभा घेताना नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर) अनेक योजना ,शासनाचा निधी ,याची माहिती ग्रामस्थपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा केला जात असून, ग्रामसभांमध्ये शासनाच्या योजनाची माहिती तसेच इतर माहिती ग्रामस्थांना दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. कळवण पंचायत समितीच्या दप्तरी मात्र कळवण तालुक्यात १०० टक्के ग्रामसभा झाल्याची नोंद आहे. (वार्ताहर)