शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वसूबारस पूजनाने आज होणार दिवाळीला प्रारंभ

By admin | Updated: November 6, 2015 23:32 IST

वसूबारस पूजनाने आज होणार दिवाळीला प्रारंभ

नाशिक : आश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळी सण साजरा करण्यात येतो. आश्विन वद्य द्वादशी या दिवशी दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असून, हा दिवस ‘गोवत्स द्वादशी’ अर्थात वसूबारस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी पारंपरिक पद्धतीने गायीचे आणि वासराचे पूजन करण्यात येते.घराघरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठीदेखील प्रसन्न वातावरणात पूजा करण्यात येते. शहराची जशी जशी वाढ होत गेली त्यामुळे शहरातील गोठे नामशेष होऊ लागले. आज शहरात पंचवटी परिसरातील पांजरापोळ, तिडके कॉलनी येथील गुरुगंगेश्वर वेदमंदिर आश्रम, तपोवन येथील कृषी गो-सेवा ट्रस्ट, दिंडोरी येथील नंदिनी गोशाळा येथे आज शनिवार (दि. ७) तर बालाजी मंदिर, गंगापूर धबधब्याजवळील कै. मोरोपंत पिंगळे गोशाळेत रविवार (दि.८) पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात येणार असून, शहरातील नागरिकांसाठीदेखील पूजा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवाळीला याच दिवसापासून सुरुवात होत असल्याने याच दिवसापासून मोठ्या आणि आकर्षक रांगोळ्या काढण्यासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह आणि लगबग बघायला मिळते. वसूबारस या दिवशी बहुतेक स्त्रियांचा उपवास असतो. वसूबारसेच्या दिवशी गहू, मूग यांचे सेवन न करता बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाण्याची पौराणिक प्रथा आहे. गाय आणि वासरू यांच्या नात्यातून जो प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांना उत्तम आरोग्य आणि सुख मिळावे, अशी वसूबारस पुजेमागील अख्यायिका आहे. (प्रतिनिधी)येथे होणार वसूबारस पूजन

  • नाशिक पांजरापोळ, निमाणी, पंचवटी.
  • गुरू गंगेश्वर वेद मंदिर आश्रम, त्र्यंबकरोड, तिडके कॉलनी.
  • कृषी गो-सेवा ट्रस्ट, तपोवन, पंचवटी.
  • कै. मोरोपंत पिंगळे गोशाळा, बालाजी मंदिर, गंगापूर धबधब्याजवळ, गंगापूर रोड.
  • ४नंदिनी गोशाळा, नाशिक- पेठ रोड, उमराळे, दिंडोरी.