शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्पा सेंटरमधील देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त

By admin | Updated: May 24, 2017 15:52 IST

स्पा सेंटरच्या नावाखाली कॉलेजरोड सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय

नाशिक : स्पा सेंटरच्या नावाखाली कॉलेजरोड सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय पोलीसांनी अखेर उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे यापुर्वी देखील या स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली होती; मात्र तरीदेखील पुन्हा स्पा सेेंटरच्या आड देहविक्री कशी सुरू झाली हा चर्चेचा विषय ठरत आहे.शहरातील कॉलेजरोड परिसर हा हायप्रोफाईल भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी विविध मॉल्स, सिनेमागृह, महाविद्यालये आहेत. या भागात सध्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने स्पा सेंटर सुरू झाले आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, विसे मळा, येवलेकर मळा आदि भागांमध्ये स्पा सेंटरचे जाळे वाढत असून यामध्ये बहुसंख्य स्पासेंटरच्या आतमध्ये देहविक्री होत असल्याचे अनेकदा पोलिसांच्या कारवाईमधून उघडकीस आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश देवीकर यांनी महिला पोलिसांच्या पथकासोबत येथील ‘एक्झोटिक’ स्पा सेंटरवर धाड टाकली. यावेळी सेंटरमधून सात मुलींना ताब्यात घेण्यात आले.

तसेच पाच पुरूषांनाही अटक करण्यात आली असून स्पा सेंटरचा मालक संशयित परेश सुराणा हा फरार असून त्याच्यावर देहविक्रीच्या व्यवसाय चालविण्याप्रकरणी पोलिसांनी पुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित सुराणा याचा शोध सुरू असल्याचे देविकर यांनी सांगितले. या स्पा सेंटरवर कारवाईची दुसरी वेळ असून यापुर्वी कारवाई होऊनदेखील पुन्हा स्पा सेंटर सुरू कसे झाले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.