शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा, बैठका आणि प्रचारही

By admin | Updated: February 14, 2017 01:12 IST

धावपळीत उमेदवारांपर्यंत पोहचण्याची धडपड

नाशिक : सकाळी मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर महात्मानगर मैदानावर फेरफटका आणि ज्येष्ठांच्या चर्चेने राजकीय प्रचाराला सुरुवात होते. आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतानाच एकेका उमेदवाराचे फोन सुरू होतात आणि त्यांच्या प्रचारासाठी येण्याची वेळ निश्चित करून सुरू होतो राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा दिवसभराचा दौरा. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचार सुरू असतांनाच राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांचा दिनक्रम कसा असतो याबाबत लोकमतने ‘एक दिवस शहराध्यक्षांसमवेत’ उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या समवेत दौरा करण्यात आला. शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे रंजन ठाकरे यांना सकाळी पहिला फोन आला तो परिसरात पाणीपुरवठा झाला नाही याचा. फोनवरच त्यांनी संबंधित नागरिकाचे निरसन केले. पाइपलाइन दुरुस्तीनंतर सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी इतर नागरिकांनाही फोनवरूनच आश्वस्त केले. गाडी सुरू झाली आणि कामगारनगर गाठले. कामगारनगरमधील नागरिकांच्या चर्चेने त्यांचा दिवस सुरू झाला. चर्चा अर्थात प्रचारयंत्रणेचीच होती. यादरम्यानही उमेदवारांचे फोन सुरूच होते. प्रभाग आठमधील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उमेदवार प्रतीक्षेत असल्याने गाडीने वेग घेतला आणि उद्घाटनस्थळी पोहचल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.  दहा ते पंधरा मिनिटांच्या या धावपळीत उद्घाटन आणि प्रचाराचे सोपस्कार पूर्ण करीत ठाकरे यांनी काही मिनिटांत आनंदवलीहून नांदूर नाका गाठला. नांदूरगावात उमेदवारांसमवेत प्रचारफेरीत सहभाग घेऊन त्यांनी एका मंदिरात नारळही फोडला. मग एका छोटेखानी हॉटेलात सुमारे अर्धा तास कार्यकर्त्यांशी चर्चा केली.