शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभिरुची उंचावण्यासाठी व्हावेत प्रयत्न चर्चा

By admin | Updated: October 17, 2015 23:51 IST

सत्रातील सूर : साहित्य, संस्कृती, कला व शासकीय धोरणावर मान्यवरांनी कार्यक्रमात मांडली अभ्यासपूर्ण मते

 नाशिक : समाजाची कलेच्या प्रत्येक क्षेत्रातील सरासरी अभिरुची चिंताजनक अवस्थेत असून, ती उंचावण्यासाठी कलावंत, लोक व शासनाच्या वतीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचा सूर चर्चासत्रात निघाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र २०२५ : साहित्य, संस्कृती व कला : सामाजिक पर्यावरण आणि शासकीय धोरण’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात आज करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेत अभ्यासपूर्ण मते मांडली. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे उपस्थित होते. चर्चासत्राचे बीजभाषण ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी साहित्य, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी नाटक, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चित्रपट, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी चित्रकला-शिल्पकला, तर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी संगीत या विषयावर मते मांडली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी स्वागत केले. यशवंतराव प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनी चर्चासत्रामागील भूमिका मांडली. विनायकदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार हेमंत टकले यांनी समारोपाचे भाषण केले. लोकेश शेवडे यांनी सूत्रसंचालन केले. सदा डुंबरे यांनी आभार मानले.