शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ओझरटाऊनशिपवासीय शहर बससेवेपासून वंचित पहिल्या स्टॉपवर बस थांबत नसल्याने गैरसोय

By admin | Updated: May 14, 2014 00:02 IST

ओझरटाऊनशिप- येथील पहिल्या बसस्टॉपवर शहर वाहतूक बससेवेची बस गेल्या सहा महिन्यांपासून येत-जात नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

ओझरटाऊनशिप- येथील पहिल्या बसस्टॉपवर शहर वाहतूक बससेवेची बस गेल्या सहा महिन्यांपासून येत-जात नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.वसाहतीमध्ये राहणारे रहिवासी वैयक्तिक काम, शिक्षण व नौकरीसाठी नाशिक येथे जाताना व येताना शहर वाहतूक बससेवेच्या बसमधून प्रवास करतात त्यासाठी वसाहतीमध्ये अधिकृत सहा बस स्टॉप असून, तेथे शेडही उभारलेले आहे. ओझरटाऊनशिप ती नाशिक ४६ व नाशिकरोडसाठी ७ अशा ५३ फेर्‍या रोज २४ तासांत बसच्या होतात. ओझरटाऊनशिप ते नाशिक दरम्यान २४ थांबे असल्याने या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या बसच्या माध्यमातून म.रा.प.महामंडळाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. असे असूनही शहर वाहतूक बस सेवेची नाशिकहून ओझरटाऊनशिपला येणारी किंवा नाशिकला जाणारी शहर मार्गावरील मोठ्या गेटने टाऊनशिपमध्ये येते. तेथून दुसर्‍या बसस्टॉपजवळील भाजी मार्केट येथे वळण घेऊन बस स्टॉप क्रमांक ३ ते ६ असे प्रवासी सोडत जाते. त्याच मार्गाने परत नाशिकला जाते. बस पहिल्या स्टॉपवर गेल्या सहा महिन्यांपासून येते किंवा जात नसल्याने पहिला बस स्टॉप परिसर मरिमाता गेट, श्रमिकनगर या भागातील अनेक रहिवाशी कामानिमित्त शिक्षण व नौकरीनिमित्त जातात त्यांना शहर वाहतूक बससेवेची बस पकडण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करीत भाजीमार्केट किंवा मेनगेट येथे जावे लागते. तसेच परत येताना या भागातील प्रवाशांना भाजीमार्केट येथील वळणावर बसमधून उतरून पुन्हा पायपीट करीत घराकडे यावे लागते. यामुळे प्रवासी, महिला, वृद्ध प्रवाशांचे हाल होत असून, परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून पहिल्या बसस्टॉपवर बस आणणे व नेण्यासाठी चालक व वाहकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)---