शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:19 IST

दिंडोरी : गेल्या आठवडाभरात दिंडोरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून, पालखेड, पुणेगाव, वाघाड धरणांची ओव्हरफ्लोकडे वाटचाल सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : गेल्या आठवडाभरात दिंडोरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून, पालखेड, पुणेगाव, वाघाड धरणांची ओव्हरफ्लोकडे वाटचाल सुरू आहे. पालखेड व पुणेगावमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षी सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यंदाही धरणांमध्ये जुलै महिन्यातच समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. दिंडोरी तालुक्यात वळीवाच्या पाऊस कमी झाला; मात्र गत पंधरवड्यात झालेल्या संततधोरेने सर्व नदी-नाल्यांना पूर आल्याने धरणांच्या साठ्यांत झपाट्याने वाढ झाली आहे. पालखेड धरण ८५ टक्के भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणेगाव धरण ६५ टक्के भरल्याने विसर्ग सुरू केला आहे. वाघाड धरण ८२ टक्के ओझरखेड ४१ टक्के,करंजवन ५९ टक्के तर तिसगाव २४ टक्के भरले असून पालखेड धारण समूहात एकूण ४३ टक्के साठा झाला असून तो गतवर्षी पेक्षा जास्त आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसाने एकाच दिवसात सर्व धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. पालखेड धरणातून डाव्या कालव्याला आठ दिवसांपासून पाणी सोडले असल्याने येवला मनमाड ची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होत आहे, तर पुणेगावच्याही डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने चांदवडकरांना दिलासा मिळणार आहे.