शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर आखाड्याला बदनाम करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 16, 2015 23:43 IST

वैष्णवदास : रामसनेहीदास यांच्यावर बहिष्कार नाही

पंचवटी : चतु:संप्रदाय आखाड्यात झालेल्या बैठकीत दिगंबर आखाड्याचे कोणीही महंत उपस्थित नव्हते; मात्र तरीदेखील काही संधिसाधू दिगंबर आखाडा, लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांच्यावर बहिष्कार टाकल्याची अफवा पसरवून विनाकारण रामसनेहीदास व दिगंबर आखाड्याची बदनामी करत आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज यांनी पत्रकारांना दिली. सध्या काही संधिसाधू दिगंबर आखाडा व लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास यांच्यात फूट पाडण्याचे काम करत असून, ते अत्यंत चुकीचे आहे. महंत रामसनेहीदास हे दिगंबर आखाड्याशी संबंधित असून, लक्ष्मीनारायण मंदिराचा व दिगंबर आखाड्याचा तपोवनात सिंहस्थ कुंभमेळा भरावा यासाठी मोठे योगदान आहे. लक्ष्मीनारायण मंदिर हे नाशिकमधील मोठे मंदिर असून, मंदिरातर्फे यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यासाठी वारंवार साधुग्रामसाठी जागा दिलेली होती. साधूच्या वेशातील काहीजण विनाकारण बदनामी करून आपापसात वाद लावून देण्याचे काम करत असून, दिगंबर आखाड्याशी संबंधित असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराच्या रामसनेहीदास यांच्यावर आम्ही कोणताही बहिष्कार टाकलेला नाही. तसेच त्यांना बहिष्कृत करण्याचा अधिकार अन्य कोणत्याही आखाड्यांना नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी महंत कृष्णदास, महंत रामकिशोरदास, शिवशंकरदास आदि उपस्थित होते. (वार्ताहर)