शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

नाशिकरोड परिसरात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा

By admin | Updated: August 18, 2015 00:10 IST

नाशिकरोड परिसरात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा

नाशिकरोड : नाशिकरोड व परिसरामध्ये स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनपा विभागीय कार्यालयनाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती केशव पोरजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपा अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कमलावती कोठारी शाळाजेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राजश्री खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समिती सदस्य जगन्नाथ गायकवाड, पालक संघ उपाध्यक्ष मनीषा सोनवणे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अर्चना आव्हाड आदिंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुलींनी देशभक्तिपर गीते सादर केली. सूत्रसंचालन सुनीता सोनगिरे यांनी केले. दोम दोम शॉदवलशहा संस्थासिन्नर फाटा येथील मदरसा ए अहलेसुन्नत शहदवलउलुम येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका वैशाली भागवत, कन्हैया साळवे, मौलाना आशिकअली, शेख, इम्रान, इफ्तिकार आदि उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मदरसाचे संस्थापक अन्वर मनियार यांनी केले. यावेळी अफजल शेख, तानाजी गायधनी, सद्दाम मणियार, श्रावण काका अगोणे, चांदभाई तांबोळी, कैलास कोरडे आदि उपस्थित होते. ज्योती चिल्ड्रेन्स हॉस्पिटलशाहू पथ येथील ज्योती चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित हाडांचा ठिसुळपणा व लहान मुलांसाठी बालदमानिदान व उपचार शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर व भगूरच्या नगराध्यक्ष अनिता करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मयूर सरोदे यांनी हाडांची मोफत तपासणी व डॉ. संजीवनी सरोदे यांनी लहान मुलांना तपासून बालदमाविषयी माहिती दिली. यावेळी रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. संत आईसाहेब महाराज स्कूलपळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल व भाग्योदय प्राथमिक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव राजाराम गायधनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच गायधनी व उपसरपंच सुनीता गायखे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. यावेळी आयोजित रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी विष्णुपंत गायखे, अशोकराव गायधनी, मुख्याध्यापक टी. के. गाडे, बबनराव शेटे, शिवाजी गायखे, रमेश चंद्रमोरे, चंद्रभान आगळे, सुधाकर गायधनी, रूंजाभाऊ गायधनी, संतोष गायधनी, किरण गायधनी, चंद्रकांत उगले, एस.व्ही. बोरसे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एम. वारूंगसे व आभार एन. जी. देवकर यांनी मानले. व्हिजन अकॅडमीजेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेच्या अध्यक्ष अ‍ॅड. अंकिता मुदलियार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जेसीआय नाशिकरोड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्या सुनीथा थॉमस, प्रवीण आहिरे, दीपाली भट्टड, जयश्री बोरोले, सुवर्णा झलके, आरती साळवे, संगीता तिसावर, अमृता गायकवाड, मंदिरा सोमवंशी आदि उपस्थित होते. भगूर नगरपालिकाशिवाजी चौकात नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या हस्ते व नगरपालिका कार्यालय येथे उपनगराध्यक्षा शैलजा कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, नगरसेवक संजय शिंदे, अंबादास कस्तुरे, दीपक बलकवडे, रामनाथ कासट, संजय पवार, गोरखनाथ बलकवडे, आर. डी. साळवे, शांताराम शेटे, चेतन बागडे, प्रतिभा घुमरे, भारती साळवे, स्मिता गरोरे, संगीता कासार, स्वाती झुटे, शोभा भागवत आदि उपस्थित होते. नूतन प्राथमिक विद्यामंदिरनूतन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये मुख्याध्यापक सुभाष वाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तराचे वाटप राजाभाऊ पानसरे व शिंदे पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष सतीश शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन रंजना काळे यांनी केले. यावेळी रुपाली शहाणे, सुरेखा कानवडे, विद्या पगार, संजय खिल्लारी, निवृत्ती तुपे आदि उपस्थित होते. ति. झं. विद्यामंदिरति. झं. विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक कल्पना नागपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अनिता करंजकर, उपनगराध्यक्षा शैलजा कापसे, नगरसेवक अंबादास कस्तुरे, श्याम ढगे, संजय शिंदे, शिवाजी सोनवणे, बाळू आढाव, कैलास पाटील, सूर्यभान जगताप, नितीन जाधव, नवनीत सहारे, महेंद्र गवळी, वंदना गांगुर्डे, श्रद्धा भगरे आदि उपस्थित होते.नूतन प्राथमिक विद्यालय नूतन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक उषा परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे शशिकांत वैद्य, मधुसूदन गायकवाड, भाऊसाहेब दळवी, हंसानंद निहलानी यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन केशव गोजरे यांनी केले. यावेळी संतोष पिंपळे, योगीता गोसावी, सुलभा देशमुख आदि उपस्थित होते.