शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

गुरेवाडीला डिझेल चोरट्यांना अटक

By admin | Updated: December 12, 2015 22:58 IST

शोध : वाहनाच्या क्रमांकावरून एमआयडीसी पोलीस संशयितांपर्यंत

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या राहणाऱ्या मालट्रकमधून डिझेलची चोरी करून पळालेल्या चोरट्यांना सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोवीस तासाच्या आत जेरबंद केले. चोरीसाठी वापरलेल्या वाहनाच्या क्रमांकावरून पोलिसांना संशयित चोरट्यांना गजाआड करण्यात यश आले. गुरुवारी रात्री महालक्ष्मी हिवरा (ता. नेवासा, जि. अ.नगर) येथील ट्रकचालक देवीदास बढे यांनी झोप येत असल्याने रात्री त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र. एमएच २० डीई २१३३) महामार्गावरील गुरेवाडी शिवारात श्री स्वामी समर्थ पेट्रोलपंपाच्या आवारात उभा करून ट्रकमध्ये झोपी गेले. यावेळी तीन चोरटे त्यांच्या ट्रकजवळ आले. त्यांनी डिझेल टाकीच्या खालच्या बाजूचा नट खोलून डिझेल चोरण्यास प्रारंभ केला. यावेळी पेट्रोलपंपावर रात्रपाळीला असलेल्या मनियार नावाच्या कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन केला. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी तातडीने जवळच राहणारे पोलीस हवालदार देवीदास लाड यांना घटनेची माहिती दिली.हवालदार लाड यांनी तत्काळ पेट्रोलपंपावर धाव घेतली असता तोपर्यंत चोरट्यांनी ट्रकमधील सुमारे २५ लिटर डिझेल चोरले होते. चोरट्यांनी डिझेलच्या ट्रमसह टाटा मॅक्स- छोटा हत्ती (क्र. एमएच १५ एवाय १२५७) मधून नाशिकच्या दिशेने पळ काढला. लाड यांनी पेट्रोलपंपावरील दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचा नाशिकरोडपर्यंत पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी कारला कट मारून पळून जाण्यात यश मिळविले. क्रमांकावरून सदर वाहन इंदिरानगर (वडाळा), नाशिक भागातील असल्याची खात्री पोलिसांना पटल्याने शुक्रवारी पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी हवालदार लाड, डी. एन. खतीले, तुषार मरसाळे, गौरव सानप, सुनील जाधव यांचे पथक वडाळा व इंदिरानगर भागात तपासासाठी रवाना केले. या पथकाने संशयित आरोपी विशाल विलास वाघचौरे (२३), रा. कलानगर, इंदिरानगर नाशिक, अझर निशार शेख (२४) व शौकत सय्यद इब्राहीम (२०) (दोघेही, रा. वडाळा, नाशिक) यांना ताब्यात घेतले. संशयित डिझेल चोरट्यांना न्यायालयात उभे केले असता, त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सपकाळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)