शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गण खुला झाल्याने धुमशान रंगणार

By admin | Updated: February 2, 2017 23:22 IST

चास : इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांना डोकेदुखी

सचिन सांगळे  नांदूरशिंगोटेराजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असलेला चास पंचायत समिती गण पुन्हा एकदा सर्वसाधारण झाल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. गेली अनेक वर्षे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सदर गणावर आता आमदार राजाभाऊ वाजे यांचा प्रभाव दिसून येत आहे. या गणातून १९९७मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दापूर येथील शुभांगी सुनील आव्हाड विजयी झाल्या होत्या. १९९९मध्ये त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली होती.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने चास गणात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. पूर्वीचा दापूर व गेल्या दहा वर्षांपासून चास या नावाने ओळखला जाणारा हा गण आरक्षणाचा अपवादवगळता गेल्या अनेक वर्षांपासून वंजारी समाजाचा उमेदवार विजयी होण्याची परंपरा आहे. चास गणात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदय पुंजाभाऊ सांगळे (५८४७) यांनी कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार जगन पाटील भाबड (३५४१) यांचा दोन हजार ३०६ मतांनी पराभव केला होता. सांगळे यांनी एकहाती विजय मिळवून पंचायत समितीत प्रवेश केला होता. त्यानंतर सांगळे यांनी पाच वर्षे गटनेते म्हणून काम पाहिले. सहा महिन्यांपूर्वी सांगळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. चास गण सर्वसाधारण झाल्याने सांगळे यांना पुन्हा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सांगळे यांनी पाच वर्षाच्या काळात भोजापूर व दापूर परिसरात विविध विकासकामे मार्गी लावली आहे. खंबाळे येथे आयुर्वेदिक दवाखाना इमारत, मनेगावसह १६ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा दुरुस्ती, पर्यावरण निधी असा विविध खात्यांमार्फत पाच वर्षांच्या काळात कामे राबविली आहे. पाच वर्षांपूर्वी सांगळे व बंडूनाना भाबड एकत्र काम करत होते. अलीकडच्या काळात दोघेही विरुद्ध बाजूला आहे. बंडूनाना भाबड यांची भूमिका या गणात महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तेरा वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सन १९९२ साली झाल्या होत्या. त्यावेळी दापूर गणाची निर्मिती झाली. त्यावेळेस चास येथील जगन पाटील भाबड यांच्या पत्नी कौशल्या भाबड यांनी नळवाडी येथील कमल म्हाळू दराडे यांचा पराभव केला होता. २००२च्या निवडणुकीत चास या नावाने गणाची ओळख झाली. त्यावेळी हा गण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाला होता. त्यावेळेस दापूर येथील संगीता कडाळे विजयी झाल्या होत्या. त्यांनी चास येथील प्रयागा जाधव यांचा पराभव केला होता. चास गट महिलेसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांनी गणाकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी गणात लढत देण्याशिवाय पर्याय नाही. दिघोळेंनंतर आमदार राजाभाऊ वाजे यांचा वरचष्मा वाढल्याने शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. भाजपाने या गणात जोरदार व्यूहरचना केली आहे. दोन्हीही पक्षांकडून राजकीय डावपेच खेळण्यास प्रारंभ झाला आहे. शिवसेना व भाजपा या पक्षातील इच्छुकांनी गणात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. दापूर व चास ही दोन्ही गावे महत्त्वपूर्ण असल्याने भौगोलिकदृष्ट्या या दोन्ही गावांत उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. दिघोळे यांना मानणारा हा गण असल्याने त्यांच्याच विचाराचा उमेदवार आतापर्यंत निवडून गेलेला आहे.