शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पेलिकन पार्कच्या नामकरणावरून धूमशान

By admin | Updated: May 25, 2017 01:20 IST

नाशिक : सिडकोतील पेलिकन पार्कबाबत अद्याप न्यायनिवाडा झालेला नसताना आणि महापालिकेला पूर्णत: ताबा मिळालेला नसताना पेलिकन पार्कच्या नामकरणावरून मात्र शिवसेना-भाजपामध्ये धूमशान सुरू झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सिडकोतील पेलिकन पार्कबाबत अद्याप न्यायनिवाडा झालेला नसताना आणि महापालिकेला पूर्णत: ताबा मिळालेला नसताना पेलिकन पार्कच्या नामकरणावरून मात्र शिवसेना-भाजपामध्ये धूमशान सुरू झाले आहे. भाजपाने पेलिकन पार्कचे नामकरण ‘नमो उद्यान’ असे करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेने आता पार्कला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची भूमिका जाहीर केली आहे. सिडकोतील पेलिकन पार्कबाबत अद्याप न्यायालयीन लढाई संपलेली नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भाजपा आमदाराने मात्र त्याचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्याची मागणी केल्याने शिवसेनेने त्यास हरकत घेतली आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन पेलिकन पार्कला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी करत भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे यासाठी शिवसेनेकडून केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली जात आहे, परंतु सावरकरांच्या नावाने पक्षसंघटना चालविणाऱ्यांना सावरकरांचा विसर पडला आहे. त्याचबरोबर सिडकोतील पेलिकन पार्कलाही सावरकरांचे नाव द्यावे, ही सेनेची अगोदरपासून मागणी आहे, परंतु आता नमो उद्यान अशा नामकरणाचा घाट घातला जात आहे. मात्र, महापालिकेने जनभावना लक्षात घेऊन सावरकरांचे नाव पार्कला द्यावे, अशी मागणी अभय दिघे, रवि पाटील, संतोष बच्छाव, सचिन धोंडगे, नितीन परदेशी, समाधान बोडके, इमरान शेख, दीपक थोरात आदींनी केली आहे.