शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या ‘खजिन्या’त ३० देशांचे ‘धन’

By admin | Updated: March 26, 2017 23:03 IST

वडांगळी : वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सातवीत शिकणाऱ्या चार चिमुकल्यांनी देश-विदेशातील दुर्मीळ नाणी व नोटांचा संग्रह करून आनंद लुटला आहे

वडांगळी : एका ‘क्लिक’सरशी जगभरातील कोणत्याही विषयावरील सर्व माहिती सहज उपलब्ध होण्याचा हा इंटरनेटी जमाना. अशाही काळात जगभरातल्या एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा विषय असलेल्या एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष संग्रह करणे, तो तन मन धनाने वाढविणे, कौतुकाने इतरांना दाखविणे व त्यांच्याकडून ‘व्वा शाब्बास, फारच छान’ अशा विस्मयभरीत प्रतिक्रियांनी पाठ थोपटून घेणे यात मिळणारा आनंद काही औरच! विद्यार्थी दशेत तर असं काही करणं जेवढं अवघड त्याच्या पेक्षाही त्यापासून मिळणारा आनंद कित्येकपट मोठा. वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सातवीत शिकणाऱ्या चार चिमुकल्यांनी देश-विदेशातील दुर्मीळ नाणी व नोटांचा संग्रह करून हा आनंद भरभरून लुटला आहे. नीलेश खुळे, सर्वेश खुळे, आयुष खुळे व समर्थ खुळे हे त्या चार छंद वेड्या विद्यार्थ्यांची नावे. आजीच्या कमरेच्या पिशवीत मिळालेल्या शिवराईपासून हा छंद जोपासण्याची कल्पना प्रथम नीलेशला सुचली व पुढे त्याला इतर वर्गमित्रांची साथ मिळाली. ‘वाढता वाढता वाढे...’ या पद्धतीने आज त्यांच्याकडे ३० देशांच्या सुमारे पंधराशे नाणे-नोटांचा संग्रह जमला आहे. प्रारंभी ‘पोरखेळ’ म्हणून दुर्लक्ष झालेल्या या छंदाला आता या चिमुकल्यांच्या पालकांचीही चांगलीच साथ मिळत आहे.  आपले मित्र, पाहुणे, शिक्षक, नोकरी व्यवसायानिमित्ताने परदेशात राहणारे नागरिक यांच्याशी संपर्क साधून, यात्रा, लग्नसमारंभ यात पायपीट करून आपल्या छंदाची इतरांना माहिती देत या  चिमुकल्यांनी ही नाणी जमा केली आहेत.  आज त्यांच्या संग्रहात शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई, ईस्ट इंडिया कंपनीचे १८३९ मधील नाणे, क्वॉर्टर आना, हाफ आना, बांगलादेशचा टका, म्यानमारचा टक्का, पाकिस्तान, नेपाळ, मॉरिशस यांचा रुपया, अमेरिका, जपान, मलेशिया, हॉँगकॉँग या देशांचा डॉलर, कतारचा रियल, थायलंडचा थाईबट, इंडोनिशियाचा रुपीच, सौदी अरेबियाचा धीराम, चीनचा युआन, ग्रीसचा लिप्टन,  यूरोपचा यूरो, आफ्रिकेचा रेंड, इंग्लंडचा पौंड व पेन्स, जर्मनीचा मार्क, सिंगापूर, बोर्निओ, कॅनडा, जरसी या देशांचा सेंट, फिलीपीन्सचा पिसो, फ्रान्स बीलगुई, डेन्मार्कचा कॉर्नर आदि चलनांचा समावेश आहे.  किंग जॉर्ज पाचवा याच्या काळातील चांदीचा रुपयाही या संग्रहात दिसतो. आज भारतीय चलनात नसलेले  एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे आदी नाणीही या संग्रहात आहे. नुकत्याच ‘कागज का टुकडा’ ठरलेल्या पाचशे व हजारच्या नोटाही या संग्रहात दिमाखाने मिरवत आहेत. (वार्ताहर)सर्वच देशांची नाणी जमविणार असल्याचा निर्धार चिमुकल्यांनी जमा केलेल्या या खजिन्याचे प्रदर्शन नुकतेच विद्यालयात भरविण्यात आले होते. अभ्यास सांभाळून संग्रह जोपासण्याच्या विद्यार्थ्यांच्या या प्रवृत्तीचे विद्यार्थी व शिक्षकांनी कौतूक केले. प्राचार्य शरद रत्नाकर, पर्यवेक्षक विलास कर्डक, राजेंद्र भावसार, दीपक भालेराव व वर्गशिक्षकांनी या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. जगातील सर्वच देशांची नाणी आम्ही जमवणार असल्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला व कोणाकडेही अशा प्रकारची नाणी असतील तर आम्हाला द्यावीत असे आवाहनही त्यांनी केले आहे.