शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धुवाधार

By admin | Updated: September 18, 2015 22:29 IST

धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ

जिल्ह्यात धुवाधार धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढसिन्नर : पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात वरुणराजाने हजेरी लावल्यानंतर रुसलेला पाऊस अंतिम चरणात सिन्नरकरांवर चांगलाच बरसला. गुरुवारी रात्री २ वाजेपासून पावसाला प्रारंभ झाला. सिन्नर शहरात मुसळधार, तर तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरात सहा तासात तब्बल ८८ मिमी पाऊस पडला. यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी सिन्नरकर दुष्काळाचा सामना करीत आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पाऊस गायब झाला होता. सुमारे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाले. गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात का होईना वाढला आहे.पश्चिम भागातून उगम पावणारी म्हाळुंगी नदी वाहू लागल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक होणार आहे. शहराजवळील सरदवाडी धरणात ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा दुपारपर्यंत दिसून येत होता. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास नळपाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. चालू पावसाळ्यात गेल्या बारा तासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली असली तरी या पावसाने विहिरींना पाणी उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धरणांमध्ये चांगले पाणी आल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीचा फायदा होऊ शकतो. यावर्षी खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नजरपीक आणेवारीत सिन्नर तालुक्याततील सर्व गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यावरून दुष्काळाची व खरीप पिकांच्या नुकसानीचा अंदाज येतो.गणपतीच्या आगमनाबरोबरच पाऊस आल्याने ‘बाप्पा पावले’ अशीच चर्चा होतीे. शहरात पावसाचा जोर जास्त असून, ग्रामीण भागात मध्यम पाऊस आला. तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टाकेद परिसरात संततधार

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात पहाटे ४ वाजेपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने परिसरातील लेंडी नाला, करंजीचा ओहळ व कडवा निद दुथडी भरून वाहत आहे.ब-याच दिवसापासुन बळीराजा पावसाची वाट पाहत होता.तरी सुध्दा काहीभागात रिम झीम सरी बरसत होत्या यामुळे समाधान होत नव्हते .भातिपकासाठी पावसाची आवश्यकता तर होतीच त्यातच शुक्र वारी गणपतीचे आगमन झाले व पहाटे चार पासुन पाऊसाने जी सुरवात केली ती सांयकाळपर्यंतही सुरूच होती .या पुर्वभागात पुर्ण टाकेद धामणगाव आंबेवाडी खो-यात आज कुठेही सुर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे गणेश मंडळांची बरीच तारांबळ ऊडाली तरी सुध्दा गणेशाचे आगमन सुखकारकच ठरल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.( वार्ताहर )