शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस प्रचारासाठी ‘डीजीधन’ मेळावा

By admin | Updated: February 16, 2017 01:15 IST

नाशिकची निवड : देशात निवडक शहरांत प्रयोग

 नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यावर भर दिला असून, त्यासाठी देशपातळीवर काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ‘डीजीधन’ मेळाव्यांचे आयोजन करून त्याद्वारे जनतेत जागृती करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची त्यासाठी निवड झाली असून, त्यात नाशिकचा जिल्ह्याचा समावेश आहे. देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या या मेळाव्यांमागचा हेतू हा निव्वळ जनतेला रोकडविरहित व्यवहारासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच अशा सेवा देणाऱ्या कंपन्या, बॅँका व खासगी संस्था, सरकारी यंत्रणांना एकाच छताखाली आणून त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नांदेड व नागपूर चार जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक पातळीवर त्यासाठी ‘डीजीधन’ मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची सुरुवात गेल्या महिन्यात पुणे येथून करण्यात आली आहे. येत्या २९ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व बॅँका, संस्था, खासगी प्रतिष्ठानांचे प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणी हा मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रीयिकृत बॅँका, वित्तीय संस्था, कृषी, पुरवठा विभाग आदि खात्यांचे सुमारे दीडशेहून अधिक स्टॉल्स याठिकाणी लावण्यात येणार असून, मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांना जागेवरच बॅँकेचे खाते उघडून देण्याची सोय याठिकाणी करण्यात येणार आहे, त्याचबरोबर बॅँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे, नेट बॅँकिंगची सुविधा देणे, रोकडविरहित व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन करणे, कृषी खात्याकडून सध्या शासनाचे अनुदान थेट खात्यावर वर्ग केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्याची माहिती देणे, शक्य असल्यास त्यांचे आधार क्रमांक ‘ई-पॉस’ यंत्राशी जोडणे, रेशन दुकानदारांना पीओएस यंत्राच्या वापराबाबत प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड अशाा प्रकारे आर्थिक व्यवहाराशी संबंधित बाबींसाठी हा मेळावा भरविण्यात येणार आहे. मेळाव्याच्या दिवशी या ठिकाणी सर्वत्र मोफत वायफाय सुविधा पुरविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)