शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीनिमित्त रामकुंडात भाविकांचे स्नान

By admin | Updated: July 16, 2016 00:13 IST

टाळमृदुंगाचा गजर : शहरात विठूनामाचा जयघोष

 नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त रामकुंडात हजारो भाविकांनी पवित्र स्नान केले. नाशिकच्या रामकुंड परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी करीत टाळमृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात भाविकांनी गोदावरीत डुबकी घेत चंद्रभागेतील स्नानाची अनुभूती घेतली. दरम्यान विठ्ठलमंदिरासह शहरातील इतर मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला जाता आले नाही, नाशिकला रामकुंडावर जाऊन वारी करायची म्हणून हजारो वैष्णवजन दिंडीचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी गोदाकाठी जमले. मनातील विठ्ठलाची भक्ती आणि सावळ्या मूर्तीच्या दर्शनाच्या ओढीने भाविकांनी पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरातील विठ्ठल मंदिर व रामकुंड परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. त्याचप्रमाणे जुनी तांबट गल्लीतील तुकाराम महाराज मंदिरातील विठ्ठलमूर्ती, सराफ बाजारातील विठ्ठल मंदिर, तसेच कॉलेजरोड परिसरातील विठ्ठल मंदिरातही भाविकांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.