शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तोतया वीज कर्मचाºयांनी केली दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:36 IST

नाशिक : तुम्ही वीजबिल भरलेले नाही, बिल दाखवा, घरातील विजेचे पॉइंट दाखवा, अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचाºयांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजन असलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारी नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीत घडली़ विशेष म्हणजे अशाप्रकारे घरात घुसून चोरी केल्याची ही शहरातील तिसरी घटना आहे़

ठळक मुद्देनागरिकांमध्ये धास्ती : वृद्ध महिला टार्गेटदोन दिवसांत शहरामध्ये घडल्या तीन घटना

नाशिक : तुम्ही वीजबिल भरलेले नाही, बिल दाखवा, घरातील विजेचे पॉइंट दाखवा, अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचाºयांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजन असलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारी नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीत घडली़ विशेष म्हणजे अशाप्रकारे घरात घुसून चोरी केल्याची ही शहरातील तिसरी घटना आहे़उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्याविहार कॉलनी, गुरुद्वाराच्या पाठीमागे अलका नारायण धिवरे (७५) यांचा अरुणविहार बंगला आहे़ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धिवरे या घरी एकट्याच होत्या़ त्यावेळी ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी पुरुष घरी आले व त्यांनी एमएसईबीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तुम्ही बिल भरलेले नाही, तुम्ही भरलेल्या बिलाची पावती दाखवा, तसेच हातातील बांगड्या काढून ठेवा असे सांगितले़ यानंतर धिवरे यांनी त्यांच्या हातातील १ लाख ७७ हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या काढून त्या कपाटातील पर्समध्ये ठेवल्या होत्या़तोतया एमएसईबी कर्मचाºयांपैकी एकजण घरातील विजेचे पॉइंट दाखविण्याच्या नावाखाली वृद्ध महिला धिवरे यांना घराच्या गच्चीवर घेऊन गेला तर खाली असलेल्या दुसºया तोतया कर्मचाºयाने कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या़ या प्रकरणी धिवरे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात या दोघा तोतयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसांत तीन घटनापंचवटीतील भक्तिधामजवळील तुलसी श्याम अपार्टमेंट येथील जयश्री दिलीप जोशी (६०) यांच्या घरी गुरुवारी (दि़ १५) दुपारी दोन संशयित मीटर रिडिंग घेण्याच्या बहाण्याने घरी गेले़या ठिकाणी विजेचे पॉइंट पाहण्याच्या बहाण्याने जोशी यांचे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले़दिंडोरीरोडवरील अमृतकुंभ सोसायटीत राहणाºया नव्वद वर्षीय महिलेस जनगणनेच्या कामासाठी आल्याचे सांगून दोन संशयितांनी घरातील पाऊण लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़४उपनगरची धिवरे यांची या प्रकारची तोतया एमएसइबी कर्मचाºयांनी फसवणूक केल्याची ही तिसरी घटना आहे़